आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त होता तेव्हाही शांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहात चालणार्‍या विशेष टाडा कोर्टात ‘तो’ पहिल्यांदा आला तेव्हा अगदी शांत होता. चेहरादेखील अगदी कोरा. नंतर काही महिने तर जवळपास रोजच त्याची या विशेष कोर्टात हजेरी असायची. पण ना कधी तो चिडायचा. ना कधी त्याच्या देहबोलीत अस्वस्थता दिसायची. नजरानजर होताच ‘नमस्ते साब’ म्हणायचा आणि शांतपणे आतमध्ये जायचा. नंतर-नंतर चक्क नमस्ते साहेब, कसं काय बरं आहे का? अशी विचारणा मराठीतच करायचा. संजय दत्तच्या त्यावेळच्या वागणुकीबद्दलचे हे दाखले देत होते ऑर्थररोड जेलमधील विशेष टाडा न्यायालय आवाराचे मुख्य सुरक्षा अधिकारी अशोक वैद्य.

मूळ नाशिककर असलेले वैद्य सेवानिवृत्तीनंतर आता पुन्हा नाशिकमध्येच स्थायिक झाले आहेत. संजय दत्त याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने थेट वैद्य यांना गाठले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरून आठवणींचा हा पट सरकत गेला. मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्यावेळी एपीआय म्हणून कार्यरत असलेल्या वैद्य यांच्याकडे या खटल्याचे कामकाज ज्या विशेष टाडा न्यायालयात सुरू होते, त्या न्यायालय आवाराच्या सुरक्षेची जबाबदारी होती. 65 ते 70 जणांचा फौजफाटा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली तैनात असायचा.

वैद्य सांगत होते बॉलीवूडची कौटुंबिक पार्श्वभूमी, वडिलांची खासदारकी आणि सेलिब्रिटी स्टेट्स असलेल्या संजय दत्तसारखा आरोपी यामुळे या खटल्याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागून होते. खटल्याच्या कामकाजासाठी पहिल्यांदा संजय जेव्हा विशेष न्यायालयाच्या आवारात आला. तेव्हा तो शांत आणि संयमी होता. नजरानजर होताच ‘नमस्ते साब’ म्हणून तो शांतपणे आतमध्ये गेला, पाठोपाठ त्याचे वकीलपत्र ज्या कपिल सिब्बल यांच्याकडे होते. ते सिब्बल आपल्या 10 ते 12 सहायक वकिलांचा ताफा


दयेची याचना...
मी बदललोय, पित्याची प्रतिष्ठा होती
मला तीन मुले आहेत. माझ्या वडिलांची समाज आणि राजकारणात खूप प्रतिष्ठा होती. आता मी बदललो आहे.कोर्टात संजयच्या वतीने वकिलाने केलेले आर्जव
न्यायमूर्ती कठोर
प्रतिष्ठेने काय होते, शिक्षा भोगावीच लागेल
दत्त कुटुंबाची प्रतिष्ठा असली तरी बेकायदा शस्त्र बाळगावीत, असे नाही. संजय दत्तला शिक्षा भोगावीच लागेल.
न्यायमूर्ती पी. सदाशिवम आणि न्या. बी. एस. चौहान
...संजू ढासळला
माझी पत्नी-मुलांना शिक्षा का?
गेल्या 20 वर्षांपासून मी या दुष्टचक्रातून जात आहे. मी पुरता ढासळलो आहे. माझी मुले आणि कुटुंबालाही याबद्दल शिक्षा भोगावी लागेल.
निकालानंतर बोलताना संजय दत्त