आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Raut News In Marathi, Shiv Sena, Chhagan Bhujbal, NCP, Divya Marathi

भुजबळांचे पार्सल सेंट्रल जेलमध्ये पाठवा, संजय राऊत यांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा कान्हेरे यांच्यापासून कुसुमाग्रजांचा वारसा सांगणार्‍या नाशिकने भुजबळांसारख्या पार्सलला गेल्या वेळी निवडून दिले होते. याच भुजबळ काका-पुतण्याने भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही, असा टोला लगावत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांचे पार्सल माझगावलाही नाही, तर सेंट्रल जेलमध्ये पाठवा आणि त्यांच्या घराणेशाहीला गाडून टाका, असे आवाहन केले.
महायुतीच्या वतीने सिडकोतील पवननगर मैदानावर हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नाशिक आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाकडे लागले आहे, असे सांगत राऊत पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य भुजबळ आणि राणे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना जागा दाखवून देण्याची आता वेळ आली आहे. देशात मोदींची लाट आहेच; शिवाय भुजबळांच्या घराणेशाहीला गाडून टाकण्याचीही लाट आहे. नाशिकमध्ये भुजबळ परिवाराने स्वत:च्या कुटुंब कल्याण योजनेशिवाय दुसरी कोणतीही योजना राबविली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
या वेळी उमेदवार हेमंत गोडसे, सिन्नरचे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब वाघ, माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर, आमदार दादा भुसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, रिपाइंचे पवन क्षीरसागर यांचीही भाषणे झालीत.
मॅचिंग मफलर
बायका ज्याप्रमाणे साडीवर मॅचिंग ब्लाऊज घालतात; तसेच हे महाशय जॅकेटवर मॅचिंग मफलर घालतात, असे राऊत म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
राज यांचा फ्लॉप शो
राज यांच्यावर अधिक भाष्य न करता फ्लॉप शोविषयी आम्ही बोलत नसतो; बॉक्स ऑफिसवर आमचा सिनेमा नेहमीच सुपरहिटच ठरतो, असेही राऊत यांनी नमूद केले.
मनसेच्या डोक्यावर परिणाम
मनसेच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते मोदींचे नाव घेत असल्याची टीका राऊत यांनी सिन्नर येथील पत्रकार परिषदेत केली. उलट नाशिकला ‘आप’चा उमेदवार मनसेपेक्षाही पुढे असेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.
आदित्य ठाकरेंचा रोड शो; शरद पोंक्षेची सभा
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता पाथर्डी फाटा येथून रोड शो, तर अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासह साक्षी गणपती मंदिर येथे सायंकाळी 6.30 वाजता सभा होणार आहे.