आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय आणि चिनी पतंगांमध्ये आज रंगणार स्पर्धा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - संक्रांतीनिमित्त पतंगांची दुकाने सजू लागली आहेत. यंदा पतंग आणि मांज्याच्या भावात सरासरी 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असली तरी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच अगदी ‘गयी रे भो धिना’ असे म्हणत मनमुराद एकमेकांची पतंग काटण्याचा आनंद लुटत आहेत. खरेदीसाठी विविध दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सिडको परिसरात रविवारी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही रंगणार आहेत.
हजार रुपयांपर्यंत मांजा
पतंग उडवण्यासाठी अनेक प्रकारचा मांज्याही उपलब्ध आहे. विविध कंपन्यांचे ब्रॅँड असणारे मांजे बाजारात आले आहेत. एक रुपयापासून ते अगदी 500 ते 1000 रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत. या वर्षी तर अण्णा हजारे यांचा फोटो असणारी पतंगही बाजारात उपलब्ध आहे.
सिडकोत स्पर्धा
सिडको पसिसरात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही घेतल्या जात आहेत. या खेळात लहानांपासून तर अगदी मोठ्यापर्यंत सर्वच लोक सहभागी होत आहेत. अनेकांना यासाठी खास गुजरातहून मांजा मागविला आहे.
तीन इंची पतंग
या वर्षी सर्वांचे आकर्षण व लक्ष वेधणारी ठरली आहे ती म्हणजे हाताच्या तळव्याएवढी तीन इंची पतंग. तिच्या सोबत चक्रीदेखील आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा कुणाला भेट देण्यासाठी ही पतंग बाजारात आणली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
चायना पतंग बाजारात
चायना पतंगही बाजारात आल्या आहेत. आकर्षक रंगसंगती असलेली ही पतंग अगदी उठावदार आहे. मात्र, तरीही ग्राहकांची पसंती आहे भारतीय पतंगीलाच. चित्रपटातील नट-नट्यांची छायाचित्र असलेली, प्लास्टिकचा कागद असलेली, शेपटी असलेली अशा विविध प्रकारच्या पतंग बाजारात उपलब्ध आहेत.
भारतीय पतंगांना पसंती
या वर्षी पतंगीच्या किमती वाढलेल्या आहेत. मात्र, तरीही ग्राहकांमध्ये खरेदीसाठी झुंबड आहे. भारतीय पतंग व चायना पतंग यात चढाओढ असून, अनेक ग्राहक मात्र भारतीय पतंग घेणेच पसंत करतात. मांज्याच्याही किमती वाढलेल्या आहेत.
राजेंद्र कदम, व्यावसायिक
मजा लुटणार
या वर्षी आम्ही मनसोक्त पतंग उडवणार आहोत. मित्रांंमध्ये स्पर्धा असून, कोण कोणाची पतंग काटतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
नीलेश बागुल, युवक