आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगांसह पक्ष्यांनीही घेतली आकाशात मनसाेक्त भरारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उंच आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्यांनी यंदा उडण्याची स्पर्धा केली ती रंगीबेरंगी पतंगांशी. विसाव्यासाठी झाडावर बसल्यावर त्यांना काही क्षणात स्वच्छंद भरारीही मारता आली. अर्थात, ही किमया झाली ती नायलॉन मांज्याचा वापर यंदाच्या संक्रांतीत कमी झाल्यामुळे. ‘दिव्य मराठी’ने यंदा नायलाॅन मांजाविरोधात व्यापक स्वरूपात अभियान राबविल्याने त्याचा परिणाम संक्रांतीचा अानंद द्विगुणित हाेण्यात झाला. गेल्या वर्षी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत संक्रांतीच्या दिवशी ३० पक्ष्यांवर उपचार करण्यात अाले हाेते. यंदा मात्र केवळ तीनच जखमी पक्षी तेथे अाणण्यात अाले, ही बाब अभियानाचा परिणाम दर्शविण्यासाठी पुरेशी ठरली. नाशिकच्या पक्षीमित्रांचेही अनुभव यापेक्षा वेगळे नव्हते.
नायलाॅन मांजाने गेल्या वर्षी शेकडाे नाशिककरांचे नाक, कान, गळे, गाल जखमी केले हाेते. पक्षीही माेठ्या प्रमाणात जखमी झाले हाेते. त्यामुळेच ‘दिव्य मराठी’ने नायलाॅन मांजाविराेधात प्रबाेधन केले. िजल्हा प्रशासनासह पालिका पाेलिस प्रशासनानेही या अभियानाला साथ देत मांजा विक्रेत्यांवर छापे टाकले. त्यात शेकडाे िकलाे मांजा जप्त करून नष्ट करण्यात अाला. परिणामी, यंदा संक्रांत बहुतांशी नायलाॅन मांजामुक्त झाली. काही महाभागांनी नायलाॅनचा वापर केला. त्यामुळे सातपूरच्या एका चिमुरडीसह अाैरंगाबादराेडवरील एका तरुणाला गंभीर दुखापत झाली. मात्र, जखमींच्या संख्येत तुलनेत यंदा कमालीची घट झाली अाहे. सरकारी अधिकारी पक्षीमित्रांनी त्यास दुजाेरा िदला. नायलॉनमांजावर संक्रात; आनंदाचे उधाण. पान
^ पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या संक्रांतीस नायलाॅन मांजामुळे जखमी झालेले ३० पक्षी उपचारासाठी अाणले हाेते. यंदा तीनच पक्ष्यांवर ताे प्रसंग अाेढवला. - डाॅ.मनाेहर पगारे, पशुवैद्यकीयअधिकारी

अभियानातून प्रेरणा घेत अभिनव उपक्रम
एकीकडेनायलाॅन मांजा वापरण्याकडे नाशिककरांचा कल असताना दुसरीकडे इकाे फ्रेंडली पतंगाेत्सव साजरा करण्यासाठीही काही संस्था सरसावल्या. ‘दिव्य मराठी’च्या अभियानातून प्रेरणा घेऊन अभिनव उपक्रम राबविल्याचे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिकराेडचा पतंग महाेत्सव सातपूरला नायलाॅन मांजा नष्ट करण्यासाठी राबविलेला उपक्रम लक्षवेधी ठरला.