आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत भाषा हा ज्ञानाचा तिसरा डाेळा : नीलिमा दुसाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमात बाेलताना नीलिमा दुसाने. समवेत स्नेहल महाजन, जागृती टिळे. - Divya Marathi
कार्यक्रमात बाेलताना नीलिमा दुसाने. समवेत स्नेहल महाजन, जागृती टिळे.
सिन्नर-  अाषाढस्य प्रथम दिवसे... असे म्हटले की महाकवी कालिदासांचे स्मरण हाेते. अाषाढ महिन्यांच्या पहिल्या दिवशी अाकाशातील मेघांना साद घालून अापल्या प्रेयसीला संदेश देण्याची कल्पना अापल्या काव्यातून चितारणारे कालिदास संंस्कृतीतले अाद्यकवी म्हणून अाेळखले जातात. निसर्गावर प्रेम करण्याची प्रेरणा देणाऱ्या कालिदासांची अाठवण अाणि संस्कृत भाषेतील त्यांच्या अजरामर साहित्यकृतींचा समृद्ध अास्वाद सगळ्यांनी घ्यावा, असे अावाहन संस्कृतच्या अभ्यासिका नीलिमा दुसाने यांनी केले. 
 
चांडक कन्या विद्यालयात अाषाढ महिन्यातील पहिला दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा संस्कृत भाषा दिन माेठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. मुख्याध्यापिका स्नेहल महाजन, जागृती टिळे व्यासपीठावर उपस्थित हाेत्या. 

महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कालिदासांच्या साहित्यकृतीतील शब्दसंपदेचे दाखले देत त्यांनी महाकवींच्या प्रतिभेची अाेळख करून दिली. काेणत्याही कलेला काळाच्या बंधनात बांधता येत नाही. त्याचप्रमाणे कवी कालिदासांच्या रचना कलाकृती अजरामर असून निसर्ग काळ्या मातीवर प्रेम करून त्या प्रेरणेतून साहित्यसंपदा निर्माण करणारे कालिदास एक अद्वितीय कवी, असे दुसाने म्हणाल्या. 
 
मेघदूत, रघुवंशम‌् शिशुपाल वधम् अशा त्यांच्या अनेक साहित्यकृती केवळ अभ्यासाच्याच नाहीत तर संशाेधन ज्ञानार्जनाची साधने असल्याचे त्यांनी सांगितले. गुण मिळवून देणारा विषय एवढ्यापुरते संस्कृत भाषेकडे पाहता, ज्ञानाचा तिसरा डाेळा म्हणून ही भाषा अभ्यासावी. संगणकातही संस्कृती भाषा अन्य भाषांच्या तुलनेत अधिक चपखल बसणारी अर्थवाही भाषा असल्याचे सिद्ध झाले अाहे. मात्र, त्याचा प्रत्यक्ष उपयाेग सुरू हाेईल तेव्हा त्याचे महत्त्व अधाेरेखित हाेईल, असेही दुसाने यांनी सांगितले. 
 
विद्यार्थिनींचे संस्कृतमधून अभिवाचन 
प्रज्ञा वाघचाैरे, शर्वरी वर्पे, संजना साेनवणे यांनी विविध कथांचे यावेळी संस्कृतमधून सादरीकरण अभिवाचन केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थिनी पालकवर्ग उपस्थित हाेता. चारुशिला देवरे यांनी अाभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...