आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडव्याला सराफी पेढ्या राहाणार बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्राने दागिन्यांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ गेल्या ४० दिवसांपासून संपूर्ण देशभरातील सराफ व्यावसायिकांनी बंद पुकारला अाहे. सरकारने या दीर्घ अांदाेलनानंतरही कुठलाच ताेडगा काढला नसल्याने शुक्रवारी (दि. ८) गुढीपाडव्यालाही देशभरात सराफी पेढ्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्यामुळे इतिहास पहिल्यांदाच देशवासीयांना सराफी पेढ्यांत जाऊन मुहूर्तावरील साेने खरेदी करता येणार नसल्याचे नाशिक सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र अाेढेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गुढीपाडव्याच्या ग्राहकांना शुभेच्छा देतानाच मुहूर्तावरील साेने खरेदीसाठी हाेणाऱ्या ग्राहकांच्या गैरसाेयीबद्दल क्षमस्व असल्याचे असाेसिएशनने म्हटले अाहे. अाम्ही सर्व सराफ, सुवर्णकार सरकारचे सर्व कर भरण्यास प्राधान्य देताे, हा प्रश्न एक टक्का अबकारी कर भरण्याचा नसून, सरकारने अबकारीचे जाचक नियम अटी लादल्या असल्यामुळे इन्स्पेक्टरराज भ्रष्टाचार वाढण्यात मदत हाेईल, याला अामचा विराेध असल्याचे सुवर्णकार व्यावसायिकांचे नेते गिरीश टकले यांनी स्पष्ट केले. सरकार छाेट्या व्यावसायिकांना अडचणीत अाणण्याचा प्रयत्न करीत असून, ग्राहकांनासुद्धा या संपाचा त्रास हाेत असल्याकडे उपाध्यक्ष संजय दंडगव्हाळ यांनी लक्ष वेधले. यावेळी प्रसाद अाडगावकर, राजेंद्र दिंडाेरकर, कृष्णा नागरे, राजेंद्र भावसार, गिरीश नवसे, कन्हैया अाडगावकर अादी उपस्थित हाेते.

‘अाठ काेटी लाेकांचे प्रश्न एेकायला माेदींना नाही वेळ’ : डॉ.मनमाेहनसिंग सरकारने हाच कर अाणला हाेता. मात्र, त्यावेळच्या अांदाेलनाला भाजप गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री अाजचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही पाठिंबा दिला हाेता. मात्र, अाज माेदींना सुवर्णकारांच्या या दीर्घ अांदाेलनाची दखल घ्यावीशी वाटत नाही. सात-अाठ काेटी लाेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायावर अवलंबून असतानाही ‘मन की बात’ एेकवणाऱ्या माेदींना या लाेकांचे प्रश्न एेकायला वेळ नसल्याची खंत यावेळी सराफी व्यावसायिकांनी व्यक्त करीत भारतीय जनपा पक्षाचे राजीनामे अामचे व्यावसायिक देणार असल्याचे सांगितले.

शहरात उद्यापासून पाच पदाधिकाऱ्यांचे उपाेषण
सरकारच्या निषेधार्थ शनिवार (दि. ९)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर पाच पदाधिकारी तीन दिवस उपाेषण करणार अाहेत. या पदाधिकाऱ्यांत राजेंद्र भावसार, रमेश वाखारकर, सुनील वाघ, ईश्वर साेनवणे, दीपक शिऊरकर आदींचा समावेश असेल.

पाडव्याची २५ काेटींची उलाढाल हाेणार ठप्प
सराफी व्यावसायिकांची शहरात अाठशेवर, तर जिल्ह्यात दाेन हजारांवर दुकाने अाहेत. दुकाने बंद राहाणार असल्याने शहरात गुढीपाडव्याच्या एकाच दिवसात किमान २५ काेटी रुपयांची उलाढाल ठप्प हाेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.