आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sari Day And Tai Day Celebration At Nashik Colleges

नाशिकमध्‍ये रंगला मोस्ट अवेटेड सारी, टाय डे.. पाहा, PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ट्रेडिशनल डे झाला.. बॉलीवूड डे झाला.. ग्रुप डे झाला अगदी चॉकलेट डेसुद्धा झाला. पण या सगळ्यांपेक्षा जास्त वाट पाहिली जाते ती सारी डे, टाय डे ची.. मोस्ट अवेटेड डे म्हणून ओळख असणाऱ्या या दिवसाचे बीवायके महाविद्यालयात ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले. मुलांनी चकचकीत पार्टी वेअर्स आणि फंकी टाय घातले होते. तर मुलींनी विविध पॅटर्नच्या विविध संस्कृती दर्शविणाऱ्या साड्या नेसल्या होत्या. फॅशन हॉट्स्पॉट असणाऱ्या बीवायकेमध्ये आज काठपदरी, डिझायनर, ब्रासो, नेट असे नानाविध साड्यांचे ट्रेंड्स पहायला मिळाले. त्यातही संक्रांतीमुळे विद्यार्थिनींचा काळ्या रंगाच्या साड्यांवर भर होता. तर मुलांनी पार्टी वेअर्सबरोबरच टी शर्टवर वा कुरत्यावरही टाय लावून अनेकांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एकीकडे हा जल्‍लोष साजरा होत असतानाच दुसरीकडे गीतगायन स्पर्धाही रंगत होती.