आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा गळा आवळून खून, सरकारवाडा पोलिसात पतीसह सासरच्यांवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- माहेरून पैसे न आणल्याने पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी (दि 3) उघडकीस आला. पोलिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेराम लेन येथे रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला होता. शारदा ऊर्फ शुभांगी रविकिरण कपिले (वय 27, रा. गोरेराम लेन) या विवाहितेने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सरकारवाडा पोलिसांनी प्रथम या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात प्रथम गळा आवळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. बाळू लक्ष्मण नागरे यांनी पोलिसांत िदलेल्या फिर्यादीत म्हटले की, पती रविकिरण कपिले, लताबाई कपिले, दीर गोपाल कपिले, नणंद बाळी यांनी संगनमत करून माहेरून पैसे न आणल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केली व गळा आवळून तिचा खून केला. या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.