आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा सर्वसमावेश सी-सॅटची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीएससी परीक्षेतील सी-सॅट पेपर दोनविषयी सुरू असलेल्या वादामुळे परीक्षांर्थीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षेला अवघे काही दिवस राहिल्याने सी-सॅट रद्द करण्याची मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे.

सी-सॅट परीक्षेचे स्वरूप किचकट असून, इंजिनिअरिंग व एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना ते लाभदायी असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. सी-सॅट परीक्षेतील (कॉम्प्रेहेन्शन) या उपघटकात इंग्रजीचे हिंदीत सरळ भाषांतर केले जाते. ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही खूप अवघड जाते. ही पद्धतीच किचकट असल्याने त्याचे थेट भाषांतर न करता हिंदीसाठी स्वतंत्र पर्याय निर्माण करावा. तसेच सी-सॅटचे स्वरूप किचकट न करता ते सर्वसमावेशक असावे, अशी अपेक्षा परीक्षार्थींकडून व्यक्त केली जात आहे.

सी-सॅट परीक्षेचे स्वरूप असे
सी-सॅट पेपर-2 एकूण 200 गुणांचा आहे. त्यात 40 ते 50 टक्के प्रश्न म्हणजेच 100 गुण हे आकलन पर्यायावर असतात. इंग्रजी आकलनावर साधारण 10, तर आकलनावर इतर प्रश्न असतात. बुद्धिमत्ता, गणित, डाटा इंटरप्रिटेशन, डिसिजन मेकिंग (संवादकौशल्य) यावर आधारित प्रश्नही असतात. हिंदी भाषांतर किचकट असल्याने परीक्षार्थींना गुणवत्ता राखणे कठीण होते.

सर्वसमावेश स्वरूप हवे
४भागातील परीक्षार्थींना समोर ठेवून या परीक्षेचे स्वरूप तयार करावे. सी-सॅटमधील आकलन या उपघटकातील हिंदी व इंग्रजीसाठी स्वतंत्र पर्याय हवा. इंग्रजीतून होणारे भाषांतर सोप्या पद्धतीने व्हायला हवे. हिंदी भाषिक व प्रादेशिक भाषेतील परीक्षार्थींना आकलन घटकातील प्रश्न सोडविणे अवघड होत आहे. त्यामुळे बदलत्या पद्धतीचा विचार व्हावा. कारण सी-सॅट परीक्षेचे स्वरूप सर्वसमावेशक असेल तर सर्वांना फायदा होईल. - डॉ. जी. आर. पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
परीक्षा पुढे ढकलावी
४सी-सॅट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादामुळे परीक्षांर्थींमध्ये गोंधळ पसरला आहे. सध्या परीक्षार्थींचे अभ्यासत लक्षही लागत नाही. परीक्षा काही दिवसांवर आल्यामुळे ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी.

प्रवर देशपांडे, परीक्षार्थी सर्वांना समान न्याय हवा
- सी-सॅट परीक्षेविषयी सध्या हिंदी व इंग्रजी भाषिक असा जणू वाद सुरू आहे. सी-सॅट परीक्षा योग्य असून, तिचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. सी-सॅटमुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. मराठी, व हिंदी भाषिकांसाठी हा बदल अवघड ठरतोय. - श्वेता चाफेकर, विद्यार्थिनी