आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातबारा उतार्‍यात फेरफार करणार्‍यांवर कारवाईचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कपालेश्वर पतसंस्थेच्या जप्त मालमत्तेच्या सातबारा उतार्‍यावर फेरफार करणार्‍या तलाठी व मंडल अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाच्या जिल्हा कृती समितीची बैठक जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत र्शीराम बॅँकेच्या जप्त मालमत्तेबाबत न्यायालयाचा निकाल बॅँकेच्या बाजूने असताना, तलाठय़ाने या मालमत्तेच्या सातबारा उतार्‍यावर लीज पेडन्सीची नोंद केल्याची बाब निदर्शनास आणताच जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतही चौकशीचे आदेश दिले. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी बेकायदेशीर प्रकरणाची पुराव्यांसह माहिती देऊन नाराजी व्यक्त केली. यावर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांत विनय गोसावी व तहसीलदार सुचिता भामरे यांना बोलावून वरील आदेश दिले. जिल्हाधिकार्‍यांनी सहकार विभागास थकबाकी वसुलीचे आदेश दिले. चर्चेत अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, बी. डी. घन, उपनिबंधक सी. एम. बारी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.