आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sate Light Information Machine Required During Kumbha Mela In Nashik

आपत्ती पूर्वसूचनेसाठी हवी उपग्रह यंत्रणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - संपूर्ण देशाला हादरून टाकणा-या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कुंभमेळ्यात नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळावी म्हणून महापालिका क्षेत्रासह त्र्यंबकेश्वरला उपग्रहामार्फत 24 तास अगोदर माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज नवी दिल्लीच्या एनआयडीएम संस्थेच्या कन्सल्टंट प्रियंका लखोटे यांनी व्यक्त केली.

पुढील वर्षी भरणा-या कुंभमेळ्यासाठी देशभरातून सुमारे एक कोटी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला ला येण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक आणि सहायकारी उपाययोजनांची गरज आहे. मानवी आपत्ती हाताळण्यात प्रशासन तत्पर असले तरी वेळ आणि जागृतीअभावी शास्त्रीय अभ्यास करणे त्यांना शक्य होत नाही. थ्री डी जीआयएसमधून गंगापूर धरण क्षेत्राच्या परिसरात उपग्रहामार्फत कार्यान्वित रडारसदृश यंत्रणेमुळे आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन अभ्यास प्रशासनाला लघू व दीर्घकालीन उपयुक्त ठरू शकतो.

कुंभमेळा ऐन पावसाळ्यात भरणार आहे. भौगोलिक माहितीसह हवामान खात्याच्या माहितीनंतर पुराचा सामना करण्यासाठी त्वरित नियोजनासाठी थ्री डी जीआयएसमुळे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यंत्रणेच्या मदतीने माहिती-तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने हवामानाचा अभ्यास करून प्रशासनाला संभाव्य पूरस्थितीला समर्थपणे तोंड देणे शक्य होणार आहे.'
दीर्घकालिन उपयोग
थ्री डी बेस जीआयएस यंत्रणेचा उपयोग कुंभमेळ्याशिवाय नेहमीची प्रशासकीय कामे, जलसिंचन व पूर नियंत्रण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जल आणि मलनि:सारण, आपत्ती व्यवस्थापन व इतर नियोजनासाठी होऊ शकेल. तसेच, पालिकांना मालमत्तेचा सर्व्ह करून कर व विमा योजना निश्चिती शक्य असल्याचे मत लखोटे यांनी व्यक्त केले.

थ्री डी बेस जीआयएस काय आहे
जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) कुंभमेळा परिसराचा उपग्रहाच्या साह्याने नकाशा तयार करून गोदावरीचे जाळे, वैशिष्ट्यांचे अभ्यासात्मक विश्लेषण करेल. या भागात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो याचा अभ्यास केला जाईल. त्याआधारे पूर व संभाव्य नुकसानाचा अंदाज बांधता येईल. पुरात येणा-या इमारतींची थ्रीडी प्रतिमा तयार करण्यापूर्वी मालमत्तेचा सर्वे केला जाईल. संकलित माहितीवरून आपत्ती व्यवस्थापन शक्य होईल, असा दावा लखोटे यांनी केला.
सखोल माहितीतून व्यवस्थापन शक्य
जीआयएस यंत्रणेमुळे 24 तास अगोदर आपत्ती सूचनेतून धरण परिसरात पाण्याच्या साठ्यात किती वाढ होईल, धोक्याची पातळी केव्हा गाठली जाईल, धरणातून किती विसर्ग करायचा, विसर्गामुळे पाण्याची पातळी वाढून कुठे किती धोका संभवेल या माहितीमुळे उपाययोजना शक्य होईल. - प्रियंका लखोटे, कन्सल्टंट, एनआयडीएम