आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्पाळकरांवर पुन्हा कारवाई हाेणे शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हजाराे ठेवीदारांच्या रकमेचा अपहार प्रकरणी जामिनावर सुटलेल्या मैत्रेय कंपनीच्या मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या जामिनाची मुदत बुधवारी संपत असून, त्यांच्यावर पुन्हा कारवाईची टांगती तलवार अाहे. न्यायालयाच्या अटीप्रमाणे देशभरातील ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबतचा याेग्य अाराखडा कंपनीकडून सादर झाल्यास त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी हाेण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे, कंपनीने मुदतीच्या अातच उर्वरित ७४ लाखांची रक्कम जमा केल्याने ठेवीदारांच्या अाशा उंचावल्या असून, अाराखडा सादर करण्याची तयारी असल्याने सत्पाळकरांची कारागृहाची वारी टळूही शकते.
सत्पाळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा आणि प्राइज चीट आणि मनी सर्क्युलेशन स्कीम (बॅनिंग) अन्वये नाशकात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या गुन्ह्यात सुरुवातीला सत्पाकळर यांना अटक करून १४ दिवसांची पोलिस कोठडी त्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली हाेती. महिन्याभराच्या कालावधीत ६६१ ठेवीदारांनी पोलिसांत तक्रार दिली. यात, प्रथमदर्शनी एक कोटी ४७ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, सत्पाळकर यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता तपासी पथकाने ठेवी परत मिळण्यावर प्रश्न उपस्थित केला. यावर कंपनीने फसवणुकीची रक्कम २० िदवसांत जमा करण्याची तयारी दर्शविली. पाेलिसांनी पासपाेर्ट जप्त करण्यासह उर्वरित ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबतचा अाराखडा सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सत्पाळकर यांना अटीची पूर्तता करण्यासाठी २० दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. बुधवारी जामिनाची मुदत संपत असल्याने ती वाढवून घेण्यासाठी अर्ज दाखल केला जाणार अाहे. पाेलिसांनी उर्वरित तक्रारदारांच्या परताव्याचा अाराखडा सादर केल्यास जामीन रद्द करण्याची मागणी केल्याने त्यांची कारागृहात रवानगी हाेऊ शकते.

कंपनीच्या अाराखड्याकडे ठेवीदारांचे लक्ष : न्यायालयअादेशानुसार कंपनीने सुरुवातीला ७४ लाख अाणि उर्वरित ७४ लाखांची रक्कम दाेनच दिवसांपूर्वी कंपनीच्या अॅक्सिस बँकेतील एस्क्राे खात्यात जमा केली अाहे. पाेलिसांकडे अातापर्यंत दीड हजार ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून दीड काेटींचा अाकडा दुप्पट झाला अाहे. याबराेबरच तपासात राज्यातील गुंतवणूकदारांची संख्या १८ ते २० लाखांवर गेली असून त्यात सुमारे १३२० कोटींच्या ठेवी कंपनीकडे जमा असल्याचे पुढे अाले अाहे. या ठेवीदारांच्या परताव्याचा नेमका काेणता अाराखडा कंपनी न्यायालयात सादर करणार, याकडे लक्ष लागले अाहे.

ठेवीदारांच्या हितासाठी मैत्रेय कटिबद्ध
^न्यायालय अटी नुसार एक काेटी ४७ लाखांची रक्कम मैत्रेय कंपनीने मुदतीपूर्वीच जमा केली अाहे. उर्वरित ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबतचा अाराखडा न्यायालयात सादर केला जाणार अाहे. कंपनीवर सेबीने निर्बंध घातल्याने काही प्रमाणात अडचणी असल्या तरी ठेवीदारांच्या हितासाठी कंपनी कटिबद्ध अाहे. - अॅड. राहुल कासलीवाल (सत्पाळकरयांचे वकील)

एस्क्राे खात्याद्वारेच मिळणार रकमा
^न्यायालय अादेशानुसार मैत्रेय कंपनीने दीड काेटींची रक्कम एस्क्राे खात्यावर जमा केली अाहे. उर्वरित ठेवीदारांच्या रकमेबाबत न्यायालयात कंपनी ठेवी परत करण्याचा अाराखडा सादर करणार असून, त्याद्वारे ‘एस्क्राे’ खात्यात रकमा जमा केल्या जाणार अाहेत. ठेवीदारांनी पाेलिसांकडे तक्रारीसाठी पुढे येण्याची गरज अाहे.- एस. जगन्नाथन, पाेलिसअायुक्त
बातम्या आणखी आहेत...