आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satpur Coroporation Worker Arrest For Curruptation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाच मागणे पडले महाग, सातपूरच्या महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बेकरी उद्योगाचे 65 हजार रुपयांचे पाणीबिल कमी करून वॉटर मीटरमध्ये फेरफार करण्याच्या मोबदल्यात 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या सातपूर कार्यालयातील कर्मचारी शंकर मोतीराम घुलेविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून पाच महिन्यानंतर घुले यांच्याविरुद्ध कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला. विभागाचे अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक र्शीमती एस. व्ही. अहिरराव यांच्या पथकाने कारवाई केली. सातपूर भागातील बेकरी उद्योजकाने बिल कमी करण्यासाठी घुले यांच्याशी संपर्क साधला असता घुले यांनी 20 हजाराची मागणी केली. उद्योजकाने 13 सप्टेंबर 2012 रोजी याबाबत केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष घुले यांनी लाच मागीतली. मात्र रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ फोनवर मागणी केली. पथकाने तक्रारदार आणि संशयित घुले यांच्यातील संभाषणाची चौकशी करून गुन्हा दाखल केला. संभाषण फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे पथकाने सांगितले.

काय आहे कलम सात?
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम सातमधील तरतुदीनुसार लाच मागणे हादेखील गुन्हा असून, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी (लोकसेवक) यांच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार आल्यास कारवाई करता येते. या प्रकारात संबंधित लोकसेवकाने तक्रारदाराकडून लाच स्वीकारलेली नसली, तरी त्याने मागणी केल्याचे कागदोपत्री अथवा व्हाइस रेकॉर्डिंगद्वारे सिद्ध होणे गरजेचे असते. या तरतुदीच्या आधारे विभागाकडून तक्रारीची पडताळणी करून पंचासमक्ष लाच मागितल्याचा पुरावा ग्राह्य धरीत गुन्हा दाखल केला.