आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड मिनिटांत आटोपली सातपूरची प्रभाग सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - अाचारसंहितेच्याधाकामुळे एकाच नगरसेविकेच्या उपस्थितीत सातपूर प्रभागाची सभा घेऊन लाखाे रुपयांच्या कामांना सभापतींनी मंजुरी दिली. मुळात, गणपूर्तीअभावी सभा तहकूब करणे हिताचे असतानाही नगरसचिवांनी अशी बेकायदेशीर सभा हाेऊ दिल्याने ते अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. यावर ताेडगा काढण्यासाठी इतर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी सभापती अधिकाऱ्यांची धडपड दिसून अाली.

सातपूर प्रभागाची मासिक बैठक नगरसेविका सविता काळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २६) दुपारी वाजता घेण्यात अाली. सभेसाठी नगरसेविका सुरेखा नागरे या सभागृहात उपस्थित हाेत्या. सभेला सुरुवात करण्यापूर्वी नगरसचिवांसह पालिकेचे अधिकारी सभापती सदस्यांच्या प्रतीक्षेत हाेते. मात्र, पाच वाजेपर्यंत नागरे वगळता एकही नगरसेवक अथवा नगरसेविका बैठकीला अालेच नाही. अखेर नगरसेविका नागरे यांना सोबत घेत सभापती काळे यांनी बैठक घेतली. यावेळी सुमारे पंधरा लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देत अवघ्या दीड मिनिटात प्रभाग बैठक पार पाडण्यात आली. सातपूरला प्रभाग १४ नगरसेवक असताना केवळ एकच सदस्य बैठकीला उपस्थित राहिल्याने उर्वरित सदस्यांची नेमकी नाराजी कोणावर, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती.

दरम्यान, सभापतींच्या ठरावाला मंजुरी मिळण्यासाठी सूचक अनुमोदक असे दोन सदस्यही बैठकीला उपस्थित नसल्याने ही सभा बेकायदेशीर असल्याचे जाणकारांचे मत अाहे. दरम्यान, या संदर्भात नगरसचिव अावळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बातम्या आणखी आहेत...