आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरमध्ये बाॅम्बच्या अफवेने गाेंधळ,तपासणीत अाढळले कपडे, सुटकेचा नि:श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाेलिसांच्या बाॅम्बशाेधक पथकाकडून तत्काळ कारवाई - Divya Marathi
पाेलिसांच्या बाॅम्बशाेधक पथकाकडून तत्काळ कारवाई
सातपूर- सातपूर औद्योगिक वासहतीतील सीएट कंपनी समोर बेवारस बॅगमध्ये बाॅम्ब असल्याची अफवा पसरल्याने अाैद्याेगिक वसाहतीत एकच गाेंधळ उडाला. पाेलिसांनी बाॅम्बशाेधक पथकाच्या मदतीने बॅगेची तपासणी केल्यानंतर बॅगेत कपडे कागदपत्रे अाढळून अाल्यानंतर पाेलिसांसह कामगारांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. 
 
रविवारी (दि. ९) सकाळी सीएट कंपनीसमाेरील सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळ रात्रीपासून बेवारस बॅग पडून हाेती. दुकान बंद असल्याने सकाळी कामावर अालेल्या कामगारांनी परिसरातील नागरिकांनी बॅगबाबत चाैकशी केली, मात्र कुणीही पुढे अाल्यामुळे त्यांचा संशय बळावळा. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्यांपैकी कुणीतरी पाेलिस नियंत्रण कक्षात फाेन करून बेवारस बॅगची माहिती दिली. तसेच सीएट कंपनीच्या अगदी समाेर बॅग अाढळून अाल्याने त्यात बाॅम्ब असल्याचा संशयही व्यक्त केला. हे वृत्त कळताच सातपूर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक अशाेक पवार अापल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी त्वरित बाॅम्ब शाेधपथक श्वानपथकास पाचारण केले. पथकाने श्वान मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली असता त्यात काहीही संशयास्पद अाढळले नाही. दरम्यान, बिहार राज्यातून कामानिमित्त अालेल्या व्यक्तीची ती बॅग असल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...