आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरच्या कंपनीने ‘डॉक्टर नीअर मी’ अ‍ॅप्लिकेशन केले विकसित; डॉक्टरांची माहिती मोबाइलवर तत्काळ;

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर एमआयडीसीच्या ट्रिनिटी व्हेंचर्स या कंपनीने जवळच्या डॉक्टरांचा पत्ता सांगणारे ‘डॉक्टर नीअर मी’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनवले आहे. परिसरातील डॉक्टरांची माहिती पुरवणारे अ‍ॅप्लिकेशन आहे.
ग्राहकांच्या गरजा ओळखून मोबाईल बॅँकिंग, शॉपिंग यांसारख्या विविध सुविधा मोबाइलद्वारे मिळतात. ‘डॉ. नीअर मी’ हे अ‍ॅप्लिकेशन याच प्रकारची सेवा पुरविते. ते यूजर फ्रेंडली आहेच, शिवाय मोफत सेवा देते. एकाच छताखाली विविध सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले असून, नवनवे अ‍ॅप्लिकेशन्स दरमहा सादर करणार असल्याचे कंपनीचे विजय तिवारी यांनी सांगितले. अनेकदा नजीकच्या डॉक्टरांची माहिती नसल्याने रुग्ण वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक टाळण्याजोग्या घटना घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यांनी घेतले परिश्रम
कंपनीच्या संशोधन व विकास टीममध्ये कार्यरत व नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या सागर वैष्णव, हितेश भिसेन, स्वप्निल मुणोत, भूषण काळे, नयनीश जोशी, श्रद्धा काले यांसारख्या युवा अभियंत्यांच्या चमूने कंपनीने दिलेल्या ट्रॅकवर या अ‍ॅप्लिकेशनसाठी परिश्रम घेतले आहेत.
ही आहेत प्रमुख वैशिष्ट्ये
अँण्ड्रॉइड फोनवर द्वारे मोफत डाउनलोड करता येते
कोणत्याही ठिकाणी मोबाईलधारक किंवा रुग्ण नजीकच्या डॉक्टरांचा तत्काळ शोध घेऊ शकतो
जवळच्या डॉक्टरांची यादी, अंतर, त्यांच्या स्पेशालिटीसह इतर माहिती उपलब्ध
गुगल मॅपच्या सहाय्याने थेट रुग्णालयापर्यंत मार्गदर्शन होते
रुग्णाचा पूर्वेतिहास अँप्लिकेशनवरील अर्जात भरून डॉक्टरांना पाठविता येतो
गंभीर स्थितीत तीन नातेवाईक किंवा मित्रांना एका क्लिकद्वारे मेसेजची सुविधा