आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण मनाची स्पंदने टिपणारा ‘सतरंगी रे’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तरुण मनाची स्पंदने टिपणारा ‘सतरंगी रे’ हा मराठी चित्रपट लोकप्रिय ठरेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अकॅडमिक करिअर आणि छंद यात आई-वडिलांच्या अपेक्षाही सांभाळत ध्येय गाठण्याची कसरत तरुणांना करावी लागते. याच कल्पनेवर बेतलेला हा चित्रपट फेब्रुवारीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपुरे, पूजा सावंत, अमृता खानविलकर या युवा कलाकारांसोबत विद्याधर जोशी, उदय टिकेकर, सीमा देशमुख अशी अनुभवी मंडळी चित्रपटात आहेत. चित्रपटातील युवा कलाकारांना इंजिनिअरिंग करत असताना स्वत:चा बॅँड तयार करायचा असतो. आदिनाथसह सिद्धार्थ, भूषण, सौमिल यांचे संगीत हेच पॅशन असते. ते साध्य करतानाची धडपड या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. शंकर महादेवन, शान, राहुल देशपांडे यांनी संगीत दिले आहे.
* ‘वेड लावी जीवा’, ‘दुभंग’ या दोन मराठी चित्रपटांनंतर तसेच स्टॅँडबाय या हिंदी चित्रपटानंतर माझा हा चौथा चित्रपट आहे. प्रेमकथा, बॉक्सर, फुटबॉलपटू अशा भूमिका केल्यानंतर आता सिंगरची आव्हानात्मक भूमिका सतरंगीच्या निमित्ताने करतोय. हा चित्रपट तरुणांना नक्कीच आवडेल. - आदिनाथ कोठारे, अभिनेता