आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मजात अंधत्व; पण जिद्द सुपर ग्रॅन्डमास्टर बनण्याची...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नशिबी जन्मजात अंधत्व... तरीही डाेळस खेळाडूंच्या समाेर बसून राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळाचे डाव ताे खेळताे... देशाचे प्रतिनिधीत्व करत १८०० एलाे रेटिंगपर्यंत मजल मारलेल्या या जिद्दी खेळाडूने भविष्यात सुपर ग्रॅन्डमास्टर (एलाे रेटिंग २६५० हून अधिक ) बनण्याचे ध्येय ठेवले असून त्या दिशेने गेल्या अाठ वर्षांपासून त्याची वाटचाल सुरू अाहे. ओडिशाचा आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू साैंदर्यकुमार प्रधान याची डाेळे विस्फारायला लावणारी ही कहाणी. 
 
नाशिकमध्ये सुरू असलेल्या फिडे मानांकन दर्जाप्राप्त स्पर्धेतही १७ वर्षीय साैंदर्यकुमारने चमक दाखवण्यास प्रारंभ केला अाहे. या स्पर्धेचा शुभारंभही त्याच्या हस्ते करण्यात अाला. त्याने डाेळस खेळाडूंनाही चकित केले असून त्याचीच चर्चा मंगळवारपासून या स्पर्धेत सुरू अाहे. ज्या सफाईदारपणे डाेळस खेळाडूंचा सामना ताे करताे, ते पाहून प्रत्येक क्रीडाप्रेमी त्याच्या बुद्धीला अाणि जिद्दीला मनाेमन सलाम करताे. 

अंधशाळा ते सामान्य शाळा : भुवनेश्वरच्या काॅलेजमध्ये प्राध्यापक असलेले वडील रवीरंजन प्रधान अाणि अाई रजनी प्रधान या दांपत्याला दाेन मुले झाली; मात्र अनुवांशिक दाेषामुळे ते दाेघेही अंध. माेठा प्राचुर्यकुमार, धाकटा साैंदर्यकुमार. दाेघांना अाधी भुवनेश्वरच्याच अंध मुलांच्या शाळेत घालण्यात अाले. मात्र, तिथे मुलांची याेग्य प्रगती हाेत नसल्याने अाणि शाळेत अधिक वेळ जात असल्याने त्यांना अनुक्रमे पाचवी अाणि अाठवीत असताना सामान्य मुलांच्या शाळेत घालण्याचा निर्णय पालकांनी घेतला. मात्र, भुवनेश्वरच्या शाळांनी दाेन्ही मुले अंध असल्याने त्यांना सामान्य मुलांबराेबर प्रवेश देण्यास नकार दिला. मग दाेघांना नजीकच्या ग्रामीण भागातील छाेट्या शाळेत घालून घरीच जास्त अभ्यास करून घेण्यास प्रारंभ करण्यात अाला. 

देशाचे पाच वेळा प्रतिनिधीत्व ते एशियन चॅम्प : साैंदर्यकुमार नववीत असताना राष्ट्रीय बी चॅम्पियन (अंधांतून) बनला. त्यानंतर तर ताे खुल्या (सामान्य खेळाडूंच्या ) स्पर्धांमध्येही राष्ट्रीय स्तरावर चमकू लागला. त्याशिवाय राष्ट्रीय बी चॅम्पियन झाल्याने अंध बुद्धिबळपटूंच्या स्पेन, सर्बिया, ग्रीस, माॅन्टेनीग्राे अाणि मॅसिडाेनिया या देशांमध्ये झालेल्या अांतरराष्ट्रीय स्पर्धांतही त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याची सर्वाेत्तम कामगिरी मॅसिडाेनियात सहाव्या क्रमांकावरील हाेती. २०१७ सालच्या मार्चमध्ये मणिपाल विद्यापीठात झालेल्या अाशियाई स्पर्धेमध्ये ताे विजेता ठरला हाेता. 

राष्ट्रीयस्पर्धेत डाेळसांशी भिडणार अंधांचा संघ : अायपीएलप्रमाणेचेसची लीग स्पर्धा चेस नॅशनल सिटीज या नावाने यंदा भुवनेश्वरमध्ये हाेणार अाहे. त्यात भारतातील प्रमुख शहरांनी त्यांच्या दिग्गज राष्ट्रीय बुद्धिबळपटूंचे संघ निवडले अाहेत. या सगळ्या दिग्गज डाेळस बुद्धिबळपटूंना लढत देण्यासाठी ‘मुंबई सिटी संघाने साैंदर्यकुमार अाणि माेठा बंधू प्राचुर्यकुमारसह सर्व अंध बुद्धिबळपटूंचा संघ उतरवला अाहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात असून, त्यानंतर लगेच हाेणाऱ्या अांतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एशियन सिटी चॅम्पिअनशिप’मध्ये साैंदर्य भारताचा प्रतिनिधी म्हणून सहभागी हाेणार अाहे.  
संगणकावर चेसबुक्स वाचताे चाैपट वेगाने 
कुटुंबियांनी दिलेल्या प्राथमिक शिक्षणानंतर साैंदर्यकुमारने संगणकावरील टाॅकिंग अॅपचा वापर करून संगणकावरील बुद्धिकळाची पुस्तके वाचण्यास प्रारंभ केला. नियमित सरावामुळे त्याचा वाचनाचा वेगही प्रचंड वाढला. साैंदर्यचा वाचनाचा वेग सामान्य माणसापेक्षा पाचपट अधिक अाहे. जी पुस्तके वाचायला सामान्य माणसाला सतत वाचून अाठ तास लागतात, तेच पुस्तक साैंदर्य दाेन तासांत वाचून माेकळा हाेताे. 

काका, वडिलांकडून प्राथमिक धडे 
साैंदर्यकुमारचे काका केसाेरंजन प्रधान जुन्या काळातील राष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळपटू. त्यामुळे घरातच हा खेळ हाेता. काका अाणि वडिलांनी मिळून दाेन्ही मुलांना पाचवीपासून बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले. मग या मुलांनी प्रारंभी अंधांच्या, तर नंतर सामान्य खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये चमक दाखवायला प्रारंभ केला. त्यानंतर काही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तर साैंदर्यकुमार विजेता तर प्राचुर्यकुमार उपविजेता तर काही स्पर्धांमध्ये प्राचुर्यकुमार विजेता, तर साैंदर्यकुमार उपविजेता ठरले. 
 
बातम्या आणखी आहेत...