आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावाना निवडणूक : 18 जागांसाठी 114 अर्ज दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतर इच्छुक अर्ज दाखल करत असताना अध्यक्षांसह इतरही कार्यकारिणी सदस्य प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी बसून राहिले हाेते. - Divya Marathi
इतर इच्छुक अर्ज दाखल करत असताना अध्यक्षांसह इतरही कार्यकारिणी सदस्य प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी बसून राहिले हाेते.
नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या २०१७ ते २०२२ या कार्यकाळासाठी हाेणाऱ्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी उडी घेतली अाहे. या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या साेमवार (दि. १३)पर्यंतच्या मुदतीत १८ जागांसाठी तब्बल ११४ अर्ज दाखल झाल्याने अविराेध निवडणुकीची शक्यता मावळली अाहे. 
 
सार्वजनिक वाचनालयाच्या यंदाच्या निवडणुकीने वेगळेच रंग घेतले अाहे. नुकतीच झालेली वार्षिक अाणि विशेष सर्वसाधारण सभा. त्यात विद्यमान कार्यकारिणीतील तिघांवर झालेले गैरव्यवहाराचे अाराेप, त्यांचे रद्द केलेले सभासदत्व यामुळे स्वच्छ कारभाराचा नारा लावत अनेकांनी या निवडणुकीत उडी घेतली अाहे. ११४ पैकी १०५ पुरुष इच्छुक तर ९ महिला इच्छुक अाहेत. विशेष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी एकाही महिलेने अर्ज दाखल केलेला नाही. वाचनालयात दिवसभर अर्ज दाखल करण्यासाठी माेठी गर्दी झाली हाेती. अनेकांना तर अर्ज दाखल करताना काय नियम असतात हेदेखील माहिती नव्हते. अध्यक्षपदासाठी किमान ५ वर्षांचे सभासदत्व, कार्यकारी मंडळ सदस्यासाठी किमान ३ वर्षांचे सभासदत्व असणे बंधनकारक अाहे. 
 
शिवाय अापण काेणतेही थकबाकीदार नसावे अर्थात अापले नाव मतदारयादीत असावे असे काही साधे नियम हाेते. पण, अनेकांना ते कळतच नव्हते. सगळ्यात धांदल उडाली ती म्हणजे अध्यक्ष अाणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताना. या अर्जावर किमान ५० सभासदांची स्वाक्षरी असावी असा नियम अाहे. अशी ५० सभासदांची स्वाक्षरी मिळवताना अनेकांच्या नाकीनऊ अाले हाेते. तर अनेकांना सूचक-अनुमाेदकच मिळत नव्हते. मग एकमेकांनीच एकमेकांच्या अर्जांवर सह्या करत वेळ मारून नेली. 

दाेन दिवस अर्जांची तपासणी
साेमवारी (दि. १३) अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अाणि त्यांचे सहायक मंगळवार (दि. १४) व बुधवार (दि. १६) या कालावधीत अर्जांची तपासणी करणार अाहेत. 
 
गुरुवारी अर्ज छाननी
दरम्यान, अर्ज तपासणी झाल्यानंतर गुरुवारी (दि. १६) राेजी अर्ज छाननी करण्यात येणार अाहे. यावेळी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उमेदवारांनी उपस्थित रहावे, असेही सांगण्यात अालेले अाहे. 
 
शुक्रवारी वैध यादी प्रसिद्धी
अर्ज छाननीत बाद झालेल्या अर्जांनंतर शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमीच्या दिवशी सकाळी ११ वाजता सावानाच्या कार्यालयात वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...