आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: ‘अभिनव भारत’ला ‘अच्छे दिन’ची अास, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी विशेष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीळभांडेश्वर लेनमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांच्या बालपणीचे निवासस्थान पडायच्या उंबरठ्यावर अाले असून, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष. - Divya Marathi
तीळभांडेश्वर लेनमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांच्या बालपणीचे निवासस्थान पडायच्या उंबरठ्यावर अाले असून, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष.
नाशिक - स्वातंत्र्यसंग्रामाच्या अग्निकुंडात अापल्या सर्वस्वाचा हाेम करणारे क्रांतिकारकांचे मेरूमणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या बालपणातील चळवळीचे केंद्र असलेल्या ‘अभिनव भारत मंदिर’ या स्मारकाच्या काेसळत्या डाेलाऱ्याला पुन्हा सावरण्याची अास सावरकरप्रेमींना लागली अाहे. सावरकरांना अादर्श मानणारे भाजपचे सरकार केंद्रात, राज्यात अाणि अाता नाशकातही सत्तेवर अाले अाहे. त्यामुळे निदान अातातरी विशेष परवानगीद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत चळवळीच्या जन्मस्थानाचे पुनरुत्थान हाेऊन त्याला तरी ‘अच्छे दिन’ लाभावेत, अशी अपेक्षा अाहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बालपणापासून युवावस्थेतील बहुतांश काळ ज्या वास्तूत गेला, ज्या वास्तूत प्रारंभी ‘मित्रमेळा’ नावाची संघटना अाणि नंतर त्याच संघटनेचे पुढचे पाऊल असलेली ‘अभिनव भारत’ संघटना स्थापन झाली. ती वास्तू अाता सुमारे दीडशे वर्षांची झाली अाहे. त्या वास्तूमध्येच सावरकरांनी १९०५ साली अभिनव भारत संघटना स्थापन केली. त्या जीर्णशीर्ण झालेल्या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मनसेच्या पंचवार्षिक काळाच्या प्रारंभीच ५० लाखांचा निधीदेखील महापालिकेने मंजूर केला. मात्र, वास्तू ब्लू लाइनमध्ये येत असल्याचे कारण देत तिच्या पुनरुत्थानालाच नव्हे, तर डागडुजीलादेखील परवानगी नाकारण्यात अाली अाहे. 

वास्तूमध्ये क्रांतिकारकांच्या चित्रांसह वाचनालयाचाही प्रयत्न 
यावास्तूची स्मृती चिरंतन राहावी यासाठी अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने वास्तूमध्ये १८५७च्या स्वातंत्र्यसमरापासून स्वातंत्र्यापर्यंत सर्वस्वाचे बलिदान केलेल्या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात अाले अाहे. त्याशिवाय, स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या गाथा सांगणारे ग्रंथालयदेखील काही काळ चालवण्यात अाले. मात्र, वास्तूच्या अवस्थेमुळे तिथे काहीही कार्य उभे करणे हे अत्यंत धाेकादायक झाले अाहे. त्यामुळेच या वास्तूसाठी ट्रस्टच्या वतीने अनेक वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा करण्यात अाला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दाैऱ्यावर अाले असतानादेखील ट्रस्टच्या वतीने त्यांना या सर्व वास्तवाची माहिती देण्यात अाली. त्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे अादेश मनपा प्रशासनाला दिले. मात्र, त्यानंतर पुन्हा हे संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात गेले अाहे. अाता तर सावरकरांना अादर्श मानणारे पंतप्रधान माेदी, त्यांना क्रांतिकारकांचे मेरूमणी मानणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य असून, नाशिक महापालिकेतदेखील भाजपची संपूर्ण सत्ता अाली अाहे. त्यामुळे अाता तरी निदान अभिनव भारत केंद्राच्या पुनरुत्थानाच्या प्लॅनला मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा सावरकरप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत अाहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, वाड्याचा काही भाग ढासळायला लागला त्याचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...