आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वा. सावरकरांचे स्मारक मार्सेलिसला हाेणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उडी मारल्याचा इतिहास देशप्रेमाचे प्रतीक मानला जाताे. भारत स्वातंत्र्यासाठी सावरकर कुटुंबीयांनी दिलेली अाहुती नतमस्तक करायलाच लावते. त्यामुळेच मार्सेलिस येथे सावरकरांचे स्मारक व्हावे, यासाठी सुरू असलेल्या सावरकरप्रेमींच्या प्रयत्नांना अखेरीस यश अाले . मार्सेलिसच्या महापाैरांनी हे स्मारक उभारण्यास नुकमंजुरी दिल्याने भारतवासीय व सावरकरप्रेमींमधून अानंद व्यक्त हाेत अाहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्याला विरोध करत त्यांच्याविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं प्रतीक म्हणजे सावरकरांची मार्सेलिस बंदरावर मारलेली उडी. त्यांच्या या उडीनंतर ते पकडले जरी गेले तरीदेखील शिक्षा झालेली असताना बोटीमधून उडी मारून मार्सेलिस बंदरापर्यंत पोहत जाण्याचा सावरकरांचा निर्णय हा क्रांतिकारी आणि धाडसीच होता. त्यांच्या धाडसाचं नव्हे तर देशप्रेमाचं प्रतीक म्हणून, त्यांनी उडी मारली त्याच ठिकाणी या घटनेचे स्मारक व्हावे, अशी सावरकरप्रेमींची इच्छा होती. त्यासाठी सावरकरप्रेमींनी ‘सावरकर मध्यवर्ती संस्था’ स्थापन करून स्मारकासाठी गेल्या सात-अाठ वर्षांपासून पाठपुरावाही सुरू केला हाेता. या संस्थेच्या वतीने संस्थेचे गणेश वढवेकर, नीलेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला व या संकल्पनेचा पाठपुरावा करत ते केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहिर यांना भेटले. अहिर यांच्या मदतीने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी सुरुवातीला पत्रव्यवहार केला, तर नंतर भेट घेऊन त्यांना स्मारकाची संकल्पना अाणि अडचण सांगितल्यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मार्सेलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून तेथील महापाैरांची मंजुरी मिळविली. फ्रान्स सरकारची लेखी परवानगी मिळण्यासाठी जरी थोडा उशीर लागला तरी हे स्मारक नक्की होईल, असा अाशावाद परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला अाहे.
लाेकवर्गणीतून स्मारक
मार्सेलिस बंदरावर ज्या ठिकाणी सावरकरांनी उडी मारली त्याच्या अासपास हे स्मारक व्हावे, अशी जरी सावरकरप्रेमींची अपेक्षा असली तरी येथील प्रशासन शहरात कुठे तरी खूप माेठी नाही, पण जागा देणार अाहे. हे स्मारक लाेकवर्गणीतून उभारले जाणार अाहे. यात सावरकरांच्या उडीचे भित्तिचित्र व त्यांच्या चारित्र्याची माहिती असणार अाहे. एका चाैथऱ्यावर हे सगळं उभारलं जाणार असून, अाजूबाजूला झाडे लावण्यात येणार अाहेत. तेथेच सावरकरांचे चरित्र, साहित्यही काेरण्यात येईल.
अाठ वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश
^गेल्या सात-अाठ वर्षांपासून अाम्ही स्मारकासाठी प्रयत्न करत हाेताे. सारखा नकारच येत हाेता. शेवटी तेथील सरकारने तुम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अामच्याकडे या, असे सांगितल्यावर तसे प्रयत्न सुरू झाले. पण, या अाधी काँग्रेसचे सरकार हाेते, त्यामुळे यासंदर्भात काहीच घडले नाही. पण, भाजपच्या सरकारमुळे अाशा पल्लवित झाल्या. आता आपली जबाबदारी स्मारक उभे करण्याची आहे.
- कॅप्टन नीलेश गायकवाड, सावरकर मध्यवर्ती संस्था, पुणे