आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे झाला स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्‍म,10 फोटोंमध्‍ये पाहा कसा आहे वाडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्‍ह्यातील भगुर या गावात 28 मे 1883 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्‍या जन्‍म झाला. भगूरमधील वाड्यात त्‍यांचे जन्‍मस्‍थान आहे. पुरातत्‍व विभागाने या वाड्याची डागडुजी केली. आज महाराष्‍ट्रातूनच नव्‍हे तर देश- विदेशातून पर्यटक,
इतिहासाचे अभ्‍यासक, सावरकरप्रेमी, भगूरला भेट देतात. 26 फेब्रुवारीला सावरकरांचा स्‍मृतीदिन. त्‍या अनुषंगाने पाहूया या वाड्यातील काही फोटो..

भगुरमध्‍ये जन्‍म..
- भगुर येथील या वास्‍तूमध्‍ये 28 मे 1883 मध्‍ये वि. दा. सावरकर यांचा जन्‍म झाला.
- सावरकरांच्‍या या वाड्याने क्रांतीकारकांच्‍या अनेक बैठका पाहल्‍या आहेत.
- स्वातंत्र्य लढ्याची रणनीती येथे ठरत होती.
- काही दिवसानंतर ते येथून निघून गेले. त्‍यानंतर हे घर दुस-याच्‍या ताब्‍यात होते.
शासनाने ताब्‍यात घेतली वास्‍तू..
- शासनाने तेव्‍हाच्‍या मालकाच्‍या ताब्‍यातून ही वास्‍तू घेतली व तिचा जीर्णोद्धार केला.
- स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या या घराचे अंगण मातीचे होते. पावसाळ्यात येथे चिखल होत होता.
- त्‍यामुळे भिंतींत ओल निर्माण् होत होती. पुरातत्‍व विभागाने येथे दगडी फरशा बसवल्‍या.
- वाड्यातील लाकडाच्‍या भागाला काही ठिकाणी वाळवी लागली होती. याचीही दखल पुरातत्‍व विभागाने घेतली आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भगुरचा वाडा...