आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन सावरकरांच्या काव्याचे, प्रेक्षकांनी अनुभवली भरतनाट्यम नृत्यशैली दिव्यांचा नृत्यखेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: भारताच्या अभिजात संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवणारी ४०० वर्षांची परंपरा असणारी भरतनाट्यम ही नृत्यकला आणि भारताच्या इतिहासात क्रांतिसूर्य ठरलेले विनायक दामोदर सावरकर यांचे ‘तेजोमयी’ शब्द यांची सांगड म्हणजे ‘तेजोमयी तेजोनिधी. ही नृत्य आणि क्रांती शब्दांची सायंकाळ नाशिककरांनी रविवारी अनुभवली.
 
सावरकरांच्या क्रांतिकारी शब्दांनी भारताचा इतिहास रंगवला. या शब्दांना भरतनाट्यम नृत्यशैलीमध्ये या कार्यक्रमात दाखवले गेले. मधुरंग प्रॉडक्शन्सतर्फे रविवारी (दि. ८) सायंकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेजोमय तेजोनिधी कार्यक्रमात ८० लाइट्सचा नृत्यखेळ प्रेक्षकांनी अनुभवला. 
 
या कार्यक्रमातील देणगी प्रवेशिकांनी मिळालेला निधी आणि मिळालेल्या स्पॉन्सरशीप ‘वनबंधू परिषद’च्या नावाने चेकद्वारे घेतले आहेत. फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे होणाऱ्या आदिवासी कल्याण उपक्रमांसाठी हा निधी वापरला जाणारा आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजिका मधुरा क्षेमकल्याणी यांनी दिली.
 
त्यानंतर कार्यक्रमात मधुरंग माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी सुनील चांडक यांनी वनबंधू परिषदेतर्फे मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आदिवासी कल्याण, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन या मुद्द्यांवर, ३६० पाड्यांवर विनाअनुदान ही संस्था काम करत असल्याची माहिती दिली. 
 
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यममधील ‘सरगम तेजोनिधी तेजोमय असीधार सावरकर’ या गाण्याने झाली. नंतर ‘हे सदया गणया तार ही’ गजवंदना सादर करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. मंचावर रंजना जोगळेकर, संपदा वागले, मधुरा क्षेमकल्याणी, नेमीचंद पोद्दार, सुनील चांडक आदी उपस्थित होते.