आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघांच्या संरक्षणासाठी सांघिक प्रयत्नांची गरज : हिरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: ताडोबा अभयारण्यात एका वाघाची शिकार झाल्यानंतर वाघांच्या संरक्षणाविषयी सर्वत्र सहवेदना व्यक्त करण्याबरोबरच चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताडोबाच्या वनक्षेत्राचा केलेला दौरा अभिनंदनीय असून, वाघांच्या संरक्षणासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहन कॉँग्रेस नेते प्रसाद हिरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानात ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतरही ताडोबात दोन वाघांची शिकार झाली. याचे पडसाद उमटले आहेत. काही महिन्यांपासून ताडोबा प्रकल्पाला वाघांच्या शिकारीचे ग्रहण लागले आहे. यामुळे वनखात्याचे अधिकारी वर्ग चिंतेत आहेत. महाराष्ट्रातील वाघांच्या शिकारींची दखल राजकीय पक्षांनीही घेतली आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी अधिक उपाययोजना होतील, अशी आशा हिरे यांनी व्यक्त केली आहे.