आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव उपक्रम: घरातील पाणी गळतीवर महिलांनो करा तुम्हीच मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अनेकदा घरातील पाण्याचे नळ नादुरुस्त होतात अथवा पाणी गळतीची समस्या उद्भवते. प्लंबिंगशी संबंधित या समस्यांमुळे गैरसोय तर होतेच शिवाय पाण्याचा अपव्ययही होतो. त्यावर मात करण्याबरोबरच महिलांच्या स्वावलंबनासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ‘पाणी देखभाल व दुरुस्ती’ प्रशिक्षण कार्यशाळा उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यशाळेत पाणी गळती व प्लंबिंगच्या किरकोळ तक्रारींबाबत मार्गदर्शन केले जाईल. जागतिक जलवर्षाच्या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने पाणी बचतीच्या बाबतीत जनजागृतीची भूमिका घेतली आहे. त्याला अनुलक्षून हा एक आगळा वेगळा उपक्रम आखला जात असल्याची माहिती प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी दिली. या उपक्रमात शहरातील विविध ठिकाणच्या सोसायट्यांमधील रहिवासी महिलांना प्लंबिंगबाबत माहिती दिली जाईल. इच्छुक महिलांनी दुपारी 12 ते 5 या वेळात 08552879758 यावर नोंदणी करावी.

सुरक्षा हादेखील उद्देश : अनेकदा घरी महिला एकट्या असतात अशा वेळी प्लंबिंगच्या कामासाठी अनोळखी व्यक्ती घरी येणे, थेट स्वयंपाकघरात अथवा स्नानगृहापर्यंत जाणे शंकास्पद ठरते. त्यावर उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातून महिला स्वावलंबनाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचाही उद्देश पूर्ण होईल, असा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे सचिव अभिजित विसपुते व सहसचिव कैलास पाटील यांनी सांगितले.