आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी बचतीसाठी बाइक रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जैन सोशल ग्रुप ऑफ प्लॅटिनमच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून गुरुवारी सकाळी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘पाणी वाचवा’ अशा घोषणा देत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये अनेक समाजबांधव उपस्थित होते.

शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनपासून सकाळी 9.30 वाजता या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. जैन सोशल ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन बागमार आणि ‘जितो’चे अध्यक्ष सतीश पारख यांनी जैन धर्माचा शांतीचा संदेश देणारा पांढरा ध्वज फडकावून रॅलीचा शुभारंभ केला. या वेळी उपाध्यक्ष विजय कोठारी, सचिन शहा, कमलेश कोठारी, सतीश हिरण आदी मान्यवर उपस्थित होते. ही रॅली कॅनडा कॉर्नर, भोंसला सर्कल, गंगापूररोडमार्गे अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार चौक, गंजमाळ सिग्नल, त्र्यंबकनाका, एबीबी सर्कल येथून महात्मानगर मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. या वेळी रस्त्यावरून जाणार्‍या मोटारसायकलस्वारांनी पोस्टर, स्टिकर्सद्वारे पाणी बचतीचा संदेश दिला. रॅलीमध्ये मिलिंद शहा, सुनील जैन, पारस लोहाडे, अशोक चोरडिया, सुनील बेदमुथा, रमण धाडिवाल, दिनेश भंडारी, पंकज पाटणी, डॉ. अतुल जैन, सुनील बाफना, नितीन राका, तुषार संकलेचा, शीतलभाई शहा, कीर्तीभाई शहा, हर्षवर्धन गांधी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.