आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाेत्सवानिमित्त सव्वा लाख महिलांच्या हातांना काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीच्या लज्जतदार फराळाची चव साऱ्यांनाच माेहिनी घालते. सातासमुद्रापार असलेल्या परदेशी पाहुण्यांना या फराळाने माेहिनी घातली नसेल तर नवल! शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळाच्या पदार्थांसह हस्तकलेच्या वस्तूंना अमेरिका, अाॅस्ट्रेलिया अाणि रशियातून यंदा चांगली मागणी हाेती. दिवाळीनिमित्त यंदा शहरातील सुमारे अडीच हजार बचत गटांतील सुमारे सव्वा लाख महिलांच्या हाताला राेजगार मिळाला. त्यातून सुमारे तीन काेटींपर्यंत उलाढाल झाल्याचे विविध बचत गटांच्या प्रमुखांशी ‘दिव्य मराठी’ने चर्चा केली असता पुढे अाले.
समृद्धी अाणि वैभवाचे प्रतीक म्हणून अालेल्या दिवाळीचा सण सगळ्यांनीच माेठ्या जल्लाेषात साजरा केला. या सणानिमित्त बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात उलाढाल झाली. यात माेठी उलाढाल झाली असेल तर ती बचत गटांच्या माध्यमातून. फराळापासून पूजेच्या साहित्यापर्यंत अाणि कपड्यांपासून हस्तकलेच्या वस्तूंपर्यंतची निर्मिती अाणि विक्री बचत गटांच्या माध्यमातून करण्यात अाली. दिवाळीनिमित्ताने झालेल्याया व्यवसायातून प्रकर्षाने पुढे अाले की, शहरात अाता खऱ्या अर्थाने महिला बचत गटांची चळवळ रुजली अाहे. व्यावसायिक पातळीवर हे गट अाता काम करीत अाहेत. इतकेच नाही तर परदेशी नागरिकांनाही बचत गटांचे पदार्थ अाणि वस्तूंना पसंती दर्शविली अाहे. कल्याणी बहुउद्देशीय संस्था, जिजाऊ महिला सेवाभावी संस्था, झेप सामाजिक संस्था अादी संस्थांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू परदेशातही विकल्या गेल्या.
महिलांनाच मिळाला नफा
^यंदा डिझायनरब्लाऊज, साड्या, काॅटनच्या साड्या, पर्सेस, फराळाचे पदार्थ, वेस्टर्न टाॅप अादींची यंदा विक्री केली. रेडिमेड वस्तू खरेदी करून बचत गटांच्या माध्यमातून त्यांची विक्री केली. त्यातील नफा संबंधित महिलांनाच मिळाला. -सुवर्णा काेठावदे, अध्यक्ष, अस्तित्व सामाजिक संस्था
व्यावसायिक स्पर्धेत अव्वल
^गेल्यावर्षीपेक्षायंदा बचत गटांनी तयार केलेले फराळाचे पदार्थ अाणि वस्तूंना अधिक मागणी हाेती. अाता सहानुभूती म्हणून नाही, तर व्यावसायिक स्पर्धेत बचत गटांची उत्पादने अव्वल ठरत असल्याने त्यांना मागणी अाहे. -ऊर्मिला सावजी, ध्येय बचत गट, महात्मानगर
फराळाच्या पदार्थांना लाभली पसंती
^नाशिकराेड येथील बचत गटाने तयार केलेले फराळाचे पदार्थ यंदा अमेरिकेतदेखील विक्रीसाठी गेले. त्याचप्रमाणे अन्य सहा ते सात बचत गटांनी दिवाळीच्या काळात काम केले. त्यातून दीड ते दाेन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. -सुनीता निमसे, अध्यक्ष, झेप सामाजिक संस्था
पुणे, मुंबईत वस्तूंची जाेरदार विक्री
^अामच्या बचतगटांनी १० लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळविले. ४०० महिलांना राेजगार मिळाला. पुणे, मुंबईत मालाला मागणी हाेती. अाम्ही तयार केलेले अाकाशकंदील रशियात विक्रीसाठी गेले. -सुनीता माेडक, अध्यक्ष, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
७५ बचत गटांचे १० लाखांपर्यंत उत्पन्न
^अामच्या एकूण७५० बचत गटांपैकी ७९ बचत गटांनी दिवाळीच्या काळात काम केले. यात सुमारे १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. फराळ अाणि हस्तकलेच्या वस्तूंची अाॅस्ट्रेलिया अाणि अमेरिकेतही विक्री झाली. -अश्विनी बाेरस्ते, अध्यक्ष, जिजाऊ महिला सेवाभावी संस्था
पूजेचे साहित्य : अगरबत्ती,कापूर, पणत्या, मेणबत्त्या, हळदी-कुंकू, लाह्या-बत्तासे अादी
वस्तूंचे पूजन बाॅक्स
खाद्यपदार्थ: लाडू,शेव, अनारसे, चिवडा, भडंग, चकल्या, सांजाेऱ्या, शंकरपाळे
महिलांसाठीविशेष : माेत्याचीरांगाेळी, कुंदन रांगाेळ्या, पूजेची थाळी, इमिटेशन ज्वेलरी.
कापडविभाग :ब्लाऊज पिस, घागरा चाेळी, साड्या, टाॅप्स, लेगीन्स, पर्सेस, बेडशिट, स्वेटर्स, कानटाेप्या.
सुशाेभीकरण: वाॅलहॅगिंग, टेबल पाॅट, फाेटाेफ्रेम
भांडी: डिश,ट्रे, वाट्या, चमचे, भेटवस्तू
कॉर्पाेरेटगिफ्ट : मिठाईबाॅक्स, ड्रायफ्रूड बाॅक्स, विविध प्रकारच्या भेटवस्तू
बातम्या आणखी आहेत...