नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने 2013-2014 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या नियतकालिकांच्या स्पर्धेत नाशिकच्या दोन महाविद्यालयांनी विभागीय स्तरावर यश मिळविले आहे.
पुणे विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून व्यावसायिक अव्यावसायिक विभागात नियतकालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मविप्र समाज संस्था संचलित केटीएचएम महाविद्यालय महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटी फार्मसी महाविद्यालय यांच्या नियतकालिकास विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. केटीएचएम महाविद्यालयाने संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त शिक्षण विचार विशेषांक असलेले ‘अक्षर’ नियतकालिक प्रकाशित केले आहे. या नियतकालिकास अव्यावसायिक विभागातून नाशिक विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी येथे दिली. तसेच पंचवटी फार्मसी कॉलेजच्या ‘नेक्टर २०१४’ या नियतकालिकास व्यावसायिक विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांनी दिली. पुणे विद्यापीठातर्फे विशेष समारंभात या दोन्ही महाविद्यालयांस हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नेक्टर नियतकालिकेसाठी संपादकीय विभागात प्रा. भूषण वाघ, प्रा. रवींद्र पाठक प्रा. शुभांगी पवार यांनी प्रयत्न केले.
रोख पारितोषिक मिळणार
पुणेिवद्यापीठांतर्गत महाविद्यालयांची ही नियतकालिक स्पर्धा व्यावसायिक अव्यावसायिक अशा दोन स्वतंत्र विभागात घेण्यात येते. या स्पर्धेतील विजेत्या महाविद्यालयास प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.