आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नपत्रिका उशिराने अन् पेपर घेण्याची घाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सध्या सुरू असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाउण तास उशिराने देण्याचा आणि सोडवलेला पेपर वॉर्निंग बेल वाजल्याबरोबर म्हणजेच दहा मिनिटे अगोदरच घेऊन टाकल्याचा प्रकार लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील रविवारी (दि. २२) झाल्याचे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये दिसून आला. त्यामुळे गंभीरपणे अभ्यास करून परीक्षेला बसलेले परीक्षार्थी पुरते गोंधळलेले आणि संतापलेले दिसत आहेत.
विद्यापीठातर्फे रितसर देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी १०.३० वाजता असणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका पहिल्या दिवशी ११.१५ वाजता मिळाली. तर दुसऱ्या दिवशी ११ वाजता प्रश्नपत्रिका मिळाल्या. शिवाय याविषयी महाविद्यालयात विचारणा केल्यावर ‘विद्यापीठाकडून पेपर आलेले नाहीत’ असे सांगण्यात आले. संतप्त विद्यार्थी परीक्षेच्या सुरुवातीचे तीनही दिवस प्रश्नपत्रिकेच्या प्रतीक्षेत रेंगाळले. घडलेल्या प्रकारामुले पुढील परीक्षेचे वेळापत्रक चुकण्याची शक्यता होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

या अनपेक्षित आणि शैक्षणिक नुकसान करणाऱ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल विचारणा केली असता महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून पेपर वेळेवर आले नसल्याचे सांगितले. तर पुणे विद्यपीठाच्या परीक्षा विभागाशी संवाद साधला असता, पेपर वेळेत गेल्याचे सांगण्यात आले होते. रविवारी (दि. २२) दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका अर्धा तास उशिरा देण्यात आल्या. यानंतर महाविद्यालयात हा प्रकार फक्त एम. ए. सह एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या परीक्षांसंदर्भातही घडत असल्याचे लक्षात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून परीक्षार्थींना रोज वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे विद्यार्थी सांगतात. या प्रकारात विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी धावपळ आणि फजिती झाल्याने यात नक्की चूक कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा प्रकार लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला असता, तर महाविद्यालयाला उत्तरे देणे सोपे होते. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांना अडचण येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून
^परीक्षांच्या दरम्यान सुरुवातीचे दोन्ही दिवस प्रश्नपत्रिका पाऊण तास उशिरा आली. तिसऱ्या दिवशी पेपर १० मिनिटे अगोदर काढून घेतला. ‘ही वॉर्निंग बेल होती’ हे पर्यवेक्षकांना पटवून देण्यात मिनिटे वाया गेली. मग उरलेली पाच मिनिटे काही वाक्ये लिहिली. परीक्षेचे शेवटचे दोन दिवस आहेत. यावेळी काय काय प्रश्न उभे रहातील, भीती वाटते. - एक परीक्षार्थी (नाव देता आले नाही)