आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य स्पर्धेतील विजेत्या नाटकासाठी सावानाचा ‘प्रयाेग’, वाचनालयातर्फे रंगकर्मींसाठी संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक वाचनालय, नाशिक नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यातच अाता अाणखी एका उपक्रमाची भर पडली अाहे, ती म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम अालेल्या नाटकांच्या प्रयाेगाची. हे नाटक सावानातर्फे रसिकांना दाखविण्यात येणार अाहे. राज्य नाट्य स्पर्धा नाशिक केंद्रावर माेठ्या जल्लाेषात पार पडते. या नाटकांतून प्रथम येणाऱ्या नाटकाचा सावानातर्फे विनामूल्य प्रयाेग ठेवण्यात येणार असल्याचे सावानाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निश्चित केले अाहे. पण, हेच नाटक जर अंतिम फेरीतही पहिले अाले तर मात्र एकच प्रयाेग ठेवण्यात येईल. मात्र, दुसऱ्या एखाद्या केंद्रावरील नाटक अंतिम फेरीत प्रथम अाले तर ते नाटक मात्र सावानातर्फे नाशिककरांना बघायला मिळेल. अर्थात सावाना फक्त नाट्यगृह विनामूल्य देणार अाहे. इतर खर्च त्या संघालाच करायचा अाहे, हे विशेष.

पहिला प्रयाेग उद्या
वाचनालयाच्याया उपक्रमातील पहिला प्रयाेग गुरुवारी (दि. १४) सायंकाळी वाजता हाेणार अाहे. नाशिक केंद्रातून प्रथम अालेल्या लाेकहितवादी मंडळाच्या ‘या ही वळणावर’ हे नाटक या उपक्रमात सादर हाेणार अाहे. रसिकांनी या नाटकाला उपस्थित राहावे, असे अावाहन लाेकहितवादी मंडळ सावानातर्फे करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...