आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावंत बंधूंनी रचला तुर्कीमध्ये इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तुर्की येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वॉटर कलर स्पर्धेत नाशिकमधील चित्रकार सावंत बंधुंनी पुन्हा तिरंगा फडकावला आहे. जगभरातील ४० देशांमधून आलेल्या चित्रकारांपैकी प्रफुल्ल सावंत यांनी प्रथम क्रमांकाचे लाख ६० हजारांचे, तर राजेश सावंत यांनी जागतिक सर्वोत्कृष्ट सहाव्या क्रमांकाचे ६५ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. चित्रकलेत आतापर्यंत ४० आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवून ते पहिले भारतीय ठरले आहेत.
इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी (आयडब्ल्यूएस) तुर्की या जागतिक संघटनेने तुर्कस्तान सरकारच्या संयुक्त विद्यमाने इझमीर राज्यातील बोर्नोवा शहरात ‘होमर लव्ह अँड पीस वॉटर कलर फेस्टीव्हल’चे आयाेजन करण्यात आले होते. ऑन स्पॉट निसर्गचित्रण स्पर्धा, चित्रप्रदर्शन वॉटर कलर फेस्टीव्हलसाठी ४० देशांतील दिग्गज चित्रकारांची निवड करण्यात आली होती. त्यात सावंत बंधुंचा समावेश होता. ‘बोर्नोवा शहराचे सौंदर्य’ हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता.
यासाठी १३ १४ मे रोजी बोर्नोव्हा शहराच्या जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर चित्रकारांना पोहचविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी बोर्नोव्हा शहराच्या मध्यावर स्थित जगप्रसिद्ध ‘बोर्नोव्हा ग्रँड बझार’चे चित्र नावीन्यपूर्ण शैलीने प्रत्यक्ष स्थळावर हुबेहूब चित्रित केले, तर राजेश सावंत यांनी बोर्नोव्हा शहरातील १८ व्या जगप्रसिद्ध वास्तू ‘ग्रीन मेन्शन’ या महालाचे फुलाई पिरियल आकाराचे निसर्गचित्र जलरंगात केले होते.
शासकीय कार्यक्रमात झाला गौरव
जगप्रसिद्ध चित्रकार डेव्हीड टेलर (ऑस्ट्रेलिया), बुंकवांग नॉनचारोन (थायलँड) अॅनी डिव्हाइन (स्कॉटलँड) या दिग्गजांनी परीक्षण केले. त्यात अनेक फेऱ्यांमधून सावंत बंधूंची चित्रे फायनल राउंडपर्यंत पोहोचली. बोर्नोव्हा शहराचे मेयर आल्गुन आटिला तुर्की सरकारच्या मंत्री आयसून बिरकान यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...