आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे स्टेट बँकेने केले परत, अारबीआयचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकेतून परस्पर पैशांचा अपहार झालेल्या दोन ग्राहकांचे लाख ४० हजारांची रक्कम ग्राहकांच्या खात्यात वर्ग केली. ग्राहकांची चूक नसल्यास रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार ग्राहकांना ही रक्कम बँकेकडून दिली जाते. या ग्राहकांच्या एटीएमचे क्लोन तयार करुन फसवणूक करणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या प्रकरणी नंदकुमार पैठणकर, मुख्य प्रबंधक स्टेट बँक सिडको यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २०१६ मध्ये बँक खातेधारक धर्मेंद्र पंचवटकर यांची लाख ३१ हजार आणि निर्मला थोरात यांची हजारांची रक्कम बँक खात्यातून परस्पर काढून घेण्यात आली असल्याचा प्रकार घडला होता. तक्रारदारांच्या एटीएम कार्डचे क्लोन बनवत त्याद्वारे रक्कम काढण्यात आली होती. 
 
या तक्रारदारांची यात चूक नसल्याचे बँकेच्या, तसेच सायबर पोलिसांच्या निदर्शनास अाले होते. यासंदर्भात सायबर पोलिसांनी बँकेला लेखी कळवले होते. बँकेने दोन्ही ग्राहाकांना अपहार झालेली रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे. मात्र, प्रकरणात या ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोन कोणी बनवले याचा तपास करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरिक्षक देवराज बोरसे तपास करत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...