आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढिसाळ कारभार: एसबीआयमध्ये पैसे काढा किंवा टाका.. दोन तास थांबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ग्राहकांचा सर्वाधिक विश्वास आणि तत्काळ सेवा देणारी बँक म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचा कारभार अत्यंत गचाळ झाला आहे. दोन-दोन तास थांबूनही ग्राहकांना व्यवहार पूर्ण करता येत नाही. अत्याधुनिक बँकिंग सुविधा प्रणालीही कुचकामी ठरत असून, बँकेच्या व्यवस्थापकांना ग्राहकांना भेटण्यासाठी किंवा समस्या जाणून घेण्यासाठी वेळच नसून कार्यालयात असतानाही ते भेटत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
या बँकेच्या जुना आग्रारोडवरील मुख्य शाखेच्या भाेंगळ कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
पैसे काढणे किंवा टाकणे या अगदी पंधरा मिनिटांच्या कामासाठी तासन‌्तास बंँकेत बसून राहावे लागत अाहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी बँकेचे सहव्यवस्थापक आपल्याच कामात मग्न असल्याचे भासवत ग्राहकांना भेटण्यास त्यांनी स्पष्ट नाकारले. त्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या ‘दिव्य मराठी’च्या दोन स्वतंत्र प्रतिनिधींनाही त्यांनी भेट नाकारली. ग्राहकांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी बँकेच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर सकाळी ११ वाजता बँक सुरू हाेऊन दुपारी वाजता जेवणाची सुटीपर्यंत व्यवहार पूर्ण करता येत नसल्याने इतर कामे करणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला.
अनेकदा ग्राहक आपल्या कार्यालयातून तास-दोन तासांची सुटी घेऊन येतात. पण, वेळेत काम होत नसल्याने त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागत असल्याच्याही भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांनाही तासनतास ताटकळत राहावे लागत असून, त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. विशेष म्हणजे पुरेसे मनुष्यबळ असताना आणि अत्याधुनिक बँकिंग यंत्रणा कार्यान्वित असूनही व्यवहार लवकरात लवकर का पूर्ण केले जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला अाहे. काम करणारे अधिकारीही व्यवस्थापकांप्रमाणेच ग्राहकांशी बोलण्याचे टाळत जणू काम टाळत असल्याचा अनुभवही ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींना मंगळवारी आला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, व्यवस्थापकांनी फोनवरही बोलणे नाकारले...संथ गतीने होते काम...