आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scaling Cloud's First Patent Get Nashik's Company

स्केलिंग क्लाउडचे पहिले पेटंट नाशकातील कंपनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डाटा सेंटरमध्ये सर्व्हरवर अनावश्यक जागा कायमस्वरूपी घेण्यासाठी त्यावर सातत्याने होणारा खर्च टाळण्यासाठी भारतीयांनी तयार केलेल्या ऑटो स्केलिंग क्लाउड कॉम्प्युटिंगला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्याबरोबरच त्याच्या संपूर्ण वापरासाठी आवश्यक असलेले स्वामित्व हक्कही (पेटंट) प्रथमच मिळवून नाशिकमधील इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीने संगणक क्षेत्रातील भारतीयांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कंपनीने विकसित केलेल्या ‘एन्लाइट क्लाउड’ या प्लॅटफॉर्मला हे पेटंट (नं. 9176788) नुकतेच प्रदान करण्यात आले. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या शिरपेचात यामुळेच आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाने (USPTO) हे स्वामित्व हक्क प्रदान केले आहेत. अशा प्रकाराचे तंत्रज्ञान विकसित करून डेटा सेंटरमध्ये हार्डवेअरवर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्नजगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केला. त्यातही इएसडीएसने स्वतःच्या संशोधन आणि विकास (R&D) विभागात केलेल्या विविध प्रयोगांमधून एन्लाइट क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. केवळ ते विकसित करण्यावरच कंपनीने समाधान मानता त्याचा गेल्या चार वर्षांपासून देशभरातील आपल्या डाटा सेंटर्समध्ये यशस्वीरीत्या वापरदेखील केला. राज्यातील अनेक शासकीय उपक्रमांसाठी तसेच देश-विदेशातील अनेक कंपन्या ग्राहकांना त्याची उपयुक्तता सिद्ध करून दाखविली.
शासनासही सहकार्य
आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारी ९० टक्के गुंतवणूक पूर्ण क्षमतेनुसार कधीच वापरली जात नाही. पण, त्याचा आर्थिक ताण आणि त्या तुलनेत वापर हा नक्कीच चिंतेचा मुद्दा होता. इएसडीएसने हजारो व्हर्चुअल मशिन्स हाताळण्याचा अनुभव घेत त्यातून हे स्वस्त, परवडण्याजोगे आणि स्केलेबल एन्लाइट क्लाउड तंत्रज्ञान विकसित केले. भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेंतर्गत सर्व व्यवस्थापनांसाठी त्यांच्या मागणीनुसार ते देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पीयूष सोमाणी, संस्थापक संचालक, इएसडीएस