आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नापास झालात, पैसे भरा अन‌् व्हा पास, प्रथम वर्षाच्या निकालात बदल केल्याचे उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य कला शाखेच्या प्रथम वर्षाचा (एफ. वाय.) निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास करून घेतल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. यातील काही विद्यार्थ्यांना केवळ उत्तीर्णच केले नसून, द्वितीय वर्षातील प्रवेशही सहजपणे करून दिला जात अाहे. या शैक्षणिक घोटाळ्यामध्ये बिटको महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग अाॅपरेशनमधून समोर आले आहे.
या प्रकरणात नापास विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी एक विषयासाठी चक्क सहा हजार रुपये या दराने पैसे घेण्यात आल्याचे बाेलले जात असून, सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना अशाप्रकारे पास केल्याची या घोटाळ्यामध्ये लाखो रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची चर्चा अाहे.
विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी काॅपी करणे, डमी बसविणे, एखाद्या शिक्षकाकडून उत्तरे जाणून घेणे, स्वत:हून हाताला जखम करून हुशार विद्यार्थ्यांकडूनउत्तरे लिहून घेणे हे प्रकार विद्यार्थी करीत होते. मात्र, नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातील हा प्रकार त्याहून अधिक पुढे जाणारा अाहे. गाेखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात (एफ. वाय.) नापास झाले होते. मात्र, महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याने या नापास विद्यार्थ्यांशी आर्थिक व्यवहार करून त्यांना पास करून घेतले. केवळ पासच केले नाही तर त्यांचा द्वितीय वर्षात प्रवेशही करून दिला आहे. काही विद्यार्थी उत्तरपत्रिकेत काहीही लिहिता पास झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा हजार रुपये घेण्यात आल्याचे बाेलले जाते. काही विद्यार्थी एक ते तीन विषय नापास झाले हाेते. त्यांच्याकडून पास करण्यासाठी प्रतिविषय ते हजार रुपये घेण्यात अाल्याची चर्चा अाहे. नाशिक जिल्ह्यात असा प्रकार होण्याची ही पहिलीच वेळ अाहे.

माहिती देण्यास टाळाटाळ : याप्रकाराबाबत ‘दिव्य मराठी’चा प्रस्तुत प्रतिनिधी प्राचार्य राम कुलकर्णी यांच्याकडे अधिक माहिती विचारण्यासाठी गेला असता, या प्रतिनिधीस त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. प्रतिनिधीने घडलेल्या प्रकाराबाबत सर्व माहिती पुराव्यासह सांगण्यास सुरुवात केल्यानंतर प्राचार्यांनीच या प्रतिनिधीकडे याबाबत माहिती मागितली.

महाविद्यालयाने पाठविल्या विद्यार्थ्यांना नोटिसा : गुणपत्रिकेतीलविसंगती आणि प्रवेशासंबंधीची अनियमितता याबाबत शहानिशा करून आपली बाजू समजावून घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चौकशी समितीसमोर उपस्थित रहाण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. उपस्थित राहिल्यास नाइलाजाने कठोर कायदेशीर कारवाईचा इशारादेखील दिला आहे.

विद्यार्थ्यांवर अन्याय नकाे
^या शैक्षणिक घोटाळ्याला विद्यार्थी जबाबदार नसून, त्यांना उत्तीर्ण होण्याचे आणि वर्ष वाया जाणार नसल्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे एकाही विद्यार्थ्यावर यामध्ये अन्याय होऊ नये. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यापासून ते महाविद्यालयाच्या प्राचार्यांवरही कडक कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ आम्ही कधीही मान्य करणार नाही -अतुल धोंगडे, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष, मनविसे

असा झाला प्रकार उघड
एका नापास विद्यार्थ्याने द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेश अर्जासाेबत चुकून नापास झाल्याचे गुणपत्रक जाेडले हाेते. त्यानंतर हा प्रकार उघड होत गेला. यामध्ये केवळ एकच विद्यार्थी नसून सुमारे दीडशे ते दोनशेच्या दरम्यान ही संख्या असल्याची चर्चा महाविद्यालयाच्या वर्तुळात अाहे.

समितीमार्फत चाैकशी
^या प्रकाराबाबत आम्ही महाविद्यालयांतर्गत समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईल -राम कुलकर्णी, प्राचार्य, बिटको महाविद्यालय

चाैकशी समिती स्थापन
बिटकाे महाविद्यालयाने या प्रकरणी सात जणांच्या चाैकशी समितीची स्थापना केली अाहे. यामध्ये डाॅ. डी. जी. बेलगावकर, डाॅ. अंजली गाैतम, प्रा. राेहित पगारे, डाॅ. सुनील जाेशी, रजिस्ट्रार दीपक चाैगुले प्रा. वैभव सराेदे यांचा समावेश अाहे. ही समिती या प्रकरणाची सखाेल चाैकशी करणार अाहेे.
बातम्या आणखी आहेत...