आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कील डेव्हलपमेंटला मिळणार आता चालना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्यावसायिक शिक्षणाला चालना मिळावी आणि त्यातूनच कुशल मनुष्यबळ विकास व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलपमेंट योजनेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. "मेक इन इंडिया'चा नारा देत उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला महाविद्यालयांसह उद्योजकता विकास रोजगार प्रशिक्षण विभाग यांनी पुढाकार घेत प्रतिसाद दिला आहे.
या योजनेमुळे व्यावसायिक शिक्षणांतर्गत वेगवेगळ्या कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु मध्यम उद्यम विभागाकडून उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत वकीलवाडी येथील अभिनव रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थी युवकांसाठी प्रशिक्षणपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव या केंद्र शासनाच्या सहयोगी संस्थेकडून दरवर्षी राज्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी आवश्यक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणा-या मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना शासनाच्या उद्योग विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. हेमंत दीक्षित यांनी दिली आहे.