आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखले ऑनलाइन ट्रान्सफर बोगस पटसंख्येला चाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बोगसपट संख्या दाखवून शिष्यवृत्तीसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळिण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सरल संगणक प्रणालीद्वारे आता विद्यार्थ्यांना आधार कार्डशी लिंक केले जाणार अाहे. याद्वारे विद्यार्थी, शिक्षक शाळा यांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली असून, आता प्रत्येक विद्यार्थ्याला सांकेतिक क्रमांक (आयडी) दिला जाणार आहे. या आयडीमुळे बोगस पटसंख्येला चाप बसणार असून, विद्यार्थ्यांचे दाखलेही ऑनलाइन ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची कागदपत्रांच्या जाचातून लवकरच कायमची सुटका होणार आहे.
शिक्षण विभागातर्फे शिक्षण व्यवस्थेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या सरल अर्थात सिस्टिमॅटिक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिर्फोर्मस फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट या संगणक प्रणालीद्वारे विद्यार्थी, शिक्षक शाळा यांची सर्व माहिती अपलोड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीला आता आधार कार्डची जोडणी केली जाणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक (आयडी) मिळणार आहे.

एकदा मिळालेला आयडी हा कायम राहणार असल्याने एकच विद्यार्थी दोन शाळांमध्ये प्रविष्ट राहू शकत नाही, त्यामुळे बोगस पटसंख्या दाखवताच येणार नाही. एवढेच नव्हे तर सरलमुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रविष्ट होण्यासाठी आता दाखला देण्याची गरज नाही. विद्यार्थ्याच्या आयडीद्वारे ऑनलाइन ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कागदपत्रांच्या जाचातून विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची सुटका होणार आहे.

‘आधार’ ची प्रक्रिया लवकरच होणार पूर्ण
^जिल्ह्यात पाचहजार ४०३ शाळा असून, एकूण बारा लाख विद्यार्थी आहेत. बहुतांश शाळांत आधार नाेंदणी मोहीम राबवली अाहे. उर्वरित शाळांमध्ये मोहीम सुरू होणार अाहे. यानंतर सरल प्रणालीत आधार लिंक केले जाईल. नवनाथ अौताडे, शिक्षणाधिकारी, जि. प.

शिष्यवृत्तीही थेट बँक खात्यात होणार जमा
सरलमुळे आधार कार्डची जोडणी झाल्यानंतर शासनाच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होऊन मिळणार आहे. यामुळे शिष्यवृत्ती वाटप होण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, गैरप्रकारांना आळा बसेल.
बातम्या आणखी आहेत...