आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉलरशिप अर्जांच्या मुदतवाढीवरून संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढविल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, विभागाच्या संकेतस्थळावर ही मुदत १६ जानेवारीपर्यंतच असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, हा विभाग मंत्री यांच्यात समन्वयच नसल्याची बाबही समोर आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी शिष्यवृत्तीचे (नवीन नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली होती. तोपर्यंत ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी होते. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या. त्यामुळे अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेक राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात संकेतस्थळावर मुदत १६ दिवसांनी वाढविल्याचा संदेश दाखविला जात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेचेउऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षांपासून या अर्जासोबत विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, ऑनलाइन कागदपत्र अपलोड होत नसल्याने फाॅर्म भरले जात नसल्याची तक्रारही विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांना मोठा मनस्ताप होत असून, सायबर कॅफेवर अर्ज भरण्यासाठी तासाप्रमाणे पैसेही मोजावे लागत आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाइन अर्जांच्या मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी वेबसाइट संथगतीने चालते अर्ज भरण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाने केले आहे. मात्र, अर्ज सादर करताना काही अडचणी उद‌्भवल्यास विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही हे वास्तव आहे.
सर्व्हर नेहमीच डाउन
शिष्यवृत्तीसाठीफाॅर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड होत नसल्याने सायबरचालकही कंटाळा करतात. वेबसाइट व्यवस्थित चालत नसल्याने शिष्यवृत्तीचे फाॅर्म भरता येत नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच, एक महिन्याची वाढ मंत्र्यांकडून दिली असताना संकेतस्थळावर १६ तारीख िदसते आहे. जगदीशबोडके, विद्यार्थीप्रतिनिधी
आता मुदतीत फॉर्म सादर केला जावा, यासाठी विद्यार्थी सायबरवर जात आहेत. फाॅर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड होत नसल्याने सायबर चालकही आता साइट व्यवस्थित चालत नसल्याने शिष्यवृत्तीचे फाॅर्म भरता येत नाहीत, असे सांगून वैतागले आहेत. काही सायबर चालक, तर शिष्यवृत्तीचे नाव ऐकताच नेटवर्क नाही, असे सांगू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्कॅनिंगसाठी अधिक पैसे
शिष्यवृत्तीसाठीया वर्षापासूनच विद्यार्थ्यांना फोटो शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसह कागदपत्र अपलोड करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आधी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. मात्र, साइटवर कागदपत्र अपलोड होत नसल्याने फॉर्म भरला जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक प्रमाणपत्राच्या स्कॅनिंगपोटी पाच रुपयांचा भुर्दंडही त्यांना सहन करावा लागतो आहे.