आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिढा शिष्यवृत्तीचा : दोन लाख अर्ज प्रलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतसरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विभागातील तब्बल एक लाख ९३ हजार ७२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आले असल्याने संबंधित विद्यार्थ्यांवर चालू वर्षाचे शुल्क भरावे लागणार की काय, अशी टांगती तलवार आहे.
दरम्यान, महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित इ-स्कॉलरशिपची प्रलंबित प्रकरणे संबंधित महाविद्यालयांनी लवकर सादर करावीत, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजकल्याण विभागातर्फे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान योजना ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात महाविद्यालयात शुल्क जमा होते. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीकडे पाठवण्याची जबाबदारी असते. मात्र, असे अर्ज करणा-या विभागातील तब्बल एक लाख ९३ हजार ७२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाइन अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

हे अर्ज विद्यार्थ्यांकडून योग्य त्या कागदपत्रांसह मागवून करून ते समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात मंजुरीसाठी सादर करण्याची जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही शहरातील काही महाविद्यालयांनी संकलित अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

महाविद्यालयांनी अर्ज तातडीने द्यावेत
प्रलंबितअर्ज महाविद्यालयांनी लवकर जमा करावेत. महाविद्यालयात शिष्यवृत्तीची प्रकरणे प्रलंबित राहिल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या सवलतीपासून वंचित ठेवले म्हणून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. काशीनाथगवळे, प्रादेशिकउपआयुक्त, समाजकल्याण विभाग

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली नको
मागासवर्गीयविद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यापुढे वसूल करण्यात येऊ नये. अशी प्रकरणे पुराव्यानिशी प्राप्त झाल्यास नाइलाजास्तव नियमाप्रमाणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणारे सर्व प्रकारचे अनुदान स्थगित करण्यात येईल. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याबाबतही वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येईल, अशी ताकीद महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
जिल्हा नोंदणीकृत महाविद्यालयांत जिल्हा पातळीवर मान्य नाकारलेले अर्ज प्रलंबित प्रलंबित
नाशिक ९४३७५ ६८०५७ १५६७७ १०४९१ १५०
धुळे ३४९४१ २६६९० ४१६० ४०७१ २०
नंदुरबार १०२७८ ५९६१ ९१८ ३३९७
जळगाव ६८९९० ५५७९३ ७२३० ५७६९ १९८
अहमदनगर ८१९६१ ३७२२४ २४६१५ १९९२७ १९५