आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अन्यथा राजीनामा द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/नाशिकरोड- सिल्व्हर ओक शाळेतील कर्मचार्‍यांच्या चौदा मुलांना पुन्हा शाळेत घ्यावे, यासाठी शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचाने मंगळवारी शिक्षण उपसंचालकांना भेटून मुलांना त्वरित शाळेत प्रवेश द्या; अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी केली. मंचाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने उपसंचालकांनी शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 22) उपसंचालक आणि संस्था अध्यक्ष यांच्यात संबंधित मुलांच्या प्रवेशाबाबत बैठक होणार आहे.

सिल्व्हर ओक शाळेच्या निलंबित आणि कामावरील कर्मचार्‍यांच्या मुलांना फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलेले आहे. या 14 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने बाजारीकरणविरोधी मंचाने शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना त्वरित शाळेत दाखल करून घ्यावे, शाळेच्या गैरव्यवहार व अनियमितताबाबत कडक कारवाई करावी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर आकसापोटी केलेल्या कारवाईची वैधता तपासावी व दंडात्मक कारवाई करावी, या मागण्या केल्या. या वेळी र्शीधर देशपांडे, डॉ. मिलिंद वाघ, छाया देव, अँड. वसुधा कराड, वासंती दीक्षित, तानाजी जायभावे, राम गायटे, जितेंद्र भावे, मुकुंद दीक्षित, प्रियदर्शन भारतीय, सिंधू शादरुल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना हक्क मिळावा : शाळेची मान्यता रद्द करावी, अशी आमची भूमिका नाही. मात्र, संबंधित 14 विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शाळेत घेण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचंचे अध्यक्ष र्शीधर देशपांडे यांनी म्हटले. उपसंचालक आंदोलकांसोबतच शाळेत : सिल्व्हर ओक शाळेतील विद्यार्थ्यांबाबत सव्वा महिन्यानंतरही निर्णय होत नसल्याने शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचाच्या आक्रमकतेमुळे मंगळवारी शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्यावर आंदोलकांसोबतच शाळेत जाण्याचा प्रसंग ओढावला.

आंदोलकांनी उपसंचालक सुपे यांच्या दालनात दाखल होऊन आक्रमकपणे मागणी मांडत सोबत शाळेत येण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सुपे यांना नाईलाजाने कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात सिल्व्हर ओक शाळेकडे जावे लागले. वरिष्ठ अधिकार्‍याला आंदोलकांसोबत जावे लागण्याची ही पहिलीच वेळ असावी.
शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्याबरोबर चर्चा करताना र्शीधर देशपांडे, अँड. वसुधा कराड, तानाजी जायभावे आदी.

मान्यता रद्दचा प्रस्ताव
शाळेमध्ये थेट भेट देऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यासाठी आदेश दिले होते. त्या वेळी शालेय प्रतिनिधी उपस्थित नसल्याने थेट शाळेचे अध्यक्ष जिजसलाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. विद्यार्थ्यांना शाळेत घेण्याबाबत त्यांना सांगितले आहे. तसे न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात प्रस्ताव पाठविला आहे. तुकाराम सुपे, शिक्षण उपसंचालक