आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन अॅडमिशन: पाल्यांचा प्रवेश; पालकांची ‘परीक्षा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात शाळा प्रवेशासाठी सध्या पालकांची धावपळ दिसून येत आहे. मात्र, यातही ठराविक शाळांमध्येच प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशासाठी जणू पालकांचीच ‘परीक्षा’ होत असल्याची स्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच पसंती दिली जात असून, नाशकिरोडला सेंट फिलोमिनामध्ये प्रवेशासाठी पालकांनी शाळेसमोरच अर्जांसाठी रांगा लावून रात्र काढली.

शाळा जून महिन्यात सुरू होतात; मात्र प्रवेशप्रक्रिया पाच महिने अगोदरच सुरू होते. सध्या शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नाशकिरोड येथील सेंट फिलोमिना शाळेच्या प्रवेश अर्जासाठी पालकांनी शाळेबाहेर मुक्काम ठोकला.

शहरात इंग्रजी माध्यमाच्या एकूण १३५ शाळा आहेहेत. या सर्व शाळांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांत प्रवेश देतात. नाशकिरोड भागात सेंट फिलोमिना, सेंट झेवियर्स, के. एन. केला, तर शहरात रंगूबाई जुन्नरे, फ्रावशी अकॅडमी, सॅक्रेड हार्ट, अशोका इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल, न्यू इरा, सेंट फ्रान्सिस, निर्मला कॉन्व्हेंट, पोद्दार इंटरनॅशनल, डॉन बास्को या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक अधिक काळजी घेताना दिसतात. त्याचप्रमाणे काही पालक दोन ते तीन शाळांचे प्रवेश अर्ज घेऊन ठेवतात. पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश नाही झाला तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येईल, अशीही सोय करून ठेवतात.

जवळच्या शाळांना द्यावे प्राधान्य
- यंदाशाळा प्रवेशाचे कोणतेही आदेश वरिष्ठांकडून आलेले नाहीत. मात्र, पालकांनी घरापासून तीन कि.मी. अंतरातील शाळांना प्राधान्य द्यावे. -किरण कुंवर, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ

तरीही पालकांची होते अर्जांसाठी गर्दी
सर्वचपालकांना प्रवेश अर्ज दिले जातील, त्यामुळे पालकांनी रात्रीच्या वेळी थांबू नये, असे फलक शाळांनी लावले आहेत. मात्र, असे असतानाही पालकांची शाळेसमोर अर्जांसाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.