आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण हक्क प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस, प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना पुन्हा नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणातील जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असून, प्रवेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांना शिक्षण मंडळाकडून पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे.
प्रवेश देण्यास नकारघंटा दर्शविणाऱ्या शाळांविरुद्ध पालकांनी तक्रारी केल्यानंतर त्याची दखल घेत शिक्षण मंडळाने या शाळांना शुक्रवारी (दि. २४) नोटीस बजावली अाहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवारी (दि. २५) शेवटची मुदत असल्याने वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरू असून, आज शेवटची मुदत आहे. प्रवेशासाठी एक दिवस राहिल्याने पालकांची शाळांमध्ये गर्दी होणार आहे. सोडत जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक असतानाही शहरातील सात ते आठ शाळांकडून प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत शिक्षण मंडळाने या शाळांना नोटीस दिली असून, विहित मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

"त्या' शाळांचा अहवाल संचालकांना पाठविणार
शिक्षणहक्कांतर्गत २५ टक्के आरक्षणाचे नियम लागू होणाऱ्या शाळांमध्ये नर्सरीमध्ये (पूर्व प्राथमिक) किंवा पहिली (प्राथमिक)मध्ये एन्ट्री लेव्हल (उपलब्धतेनुसार) प्रवेश देणे बंधनकारक अाहे. त्याबाबतच्या सर्व शाळांना सूचना दिल्या असून, प्रवेश देणाऱ्या संस्थांचा अहवाल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडेे पाठविण्यात येईल. -वसुधा कुरणावळ, प्रभारीप्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ