आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलबस हायजॅक, अतिरेक्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांचा गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वेळ सकाळी 10 वाजेची. स्थळ वाघ गुरुजी शाळा. विद्यार्थ्यांची बस अतिरेक्यांकडून हायजॅक होते, त्याचवेळी पोलिस उपायुक्तांची मोटार जाताच तिच्यावर गोळीबार, विद्यार्थ्यांचा आक्रोश.. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत वरिष्ठ अधिकार्‍यांसह शीघ्र कृती दलाने घटनास्थळी धाव घेत अतिरेक्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. तासभर चाललेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी बसवर ताबा घेत विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.

गंगापूररोडवरील मविप्रच्या वाघ गुरुजी शाळेचा परिसर कायमच गजबजलेला असताना पोलिसांकडून अचानक शुक्रवारी सकाळी अचानक विद्यार्थ्यांच्या अपहृत बसची सुटका करण्यासाठी गोळीबाराचा आवाज झाला. हा प्रसंग पाहून परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. चारही बाजूंचे रस्ते बंद करून केवळ गोळीबाराचा आणि पोलिसांच्या वॉकीटॉकीचाच आवाज ऐकायला येत होता. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांकडूनच हे प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांनी व पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या देखरेखीखाली उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, सहायक आयुक्त गणेश शिंदे, हेमराज राजपूत, पंकज डहाणे यांच्यासह सरकारवाडा, गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.