आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनफिट स्कूलबसवर आरटीओची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थी वाहतूक करणार्‍या स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र आवश्यक असून, प्रादेशिक परिवहन विभाग अशा बसवर करडी नजर ठेवणार आहे. परिवहन विभागाच्या तपासणीत अनफिट बस आढळल्यास त्या जागेवरच जप्त करणार असून, शाळा व्यवस्थापनालाही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरात सुमारे 680 स्कूल बसेसला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असून, त्यातील 180 बसच्या फिटनेसची मुदत संपली आहे. या बस शाळा सुरू होण्यापूर्वी परिवहन विभागाकडून फिटनेस प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा या बस विद्यार्थी घेऊन रस्त्यावर उतरल्याचे तपासणी पथकाला आढळून आल्यास सदर बसमधील विद्यार्थी शाळेत सोडून त्या जप्त केल्या जातील. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बस व इतर वाहनांची सक्तीने तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपपरिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरात 40हून अधिक स्कूलबसने तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त केले असून, त्यासाठी रोज काही प्रमाणात बस दाखल होत आहेत.