आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षेच्या कारणामुळे शहरात बहुतांश शाळा राहिल्या बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव येथील पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद रविवारी दिवसभर उमटल्यानंतर सोमवारी (दि. १०) शहरात तणावपूर्ण वातावरण राहिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शहर जिल्हाभरातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
रविवारच्या आंदोलनात वाहनांना लक्ष्य केले गेल्याने शिक्षणसंस्थांनी शालेय बसच्या वाहतुकीसह रिक्षा चालकांनाही वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शहरातील सर्वच माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक विभागाच्या शाळा बंद राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

तळेगाव अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी ठिकठिकाणी रास्ता रोकाे आंदोलने करत पोलिस गाड्यांसह एसटी बसेस खासगी वाहनांना लक्ष्य करून तोडफोड जाळपोळ केली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांकडून बसेसची तोडफोड केली जात असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला होता. तसेच, तणावाचे वातावरण लक्षात घेऊन पालकांनीही मुलांना शाळेत पाठवले नाही. त्यामुळे मविप्र, नाशिक एज्युकेशन सोसायटी, आदर्श शाळा, सुखदेव एज्युकेशन सोसायटी, मानवधन संस्था, उन्नती संस्था यांसह इंग्रजी माध्यमांच्या शाळाही बंद राहिल्या.

सिडको,इंदिरानगरात शाळा, महाविद्यालये बंद
तळेगाव घटनेनंतर सुरू असलेल्या अांदाेलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सुरक्षिततेसाठी शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात अाली. त्यामुळे सिडको इंदिरानगर भागातील सर्वच शाळा बंद राहिल्या. अनेक शाळांनी शाळेच्या गेटवरच बंद सुटी असल्याचे बोर्ड लावले होते. प्रशासनाच्या या निर्णयाचे पालकवर्गाने स्वागत केले. काेणत्या ही ठिकाणी दुर्दैवी घटना घडली नाही. शाळा बंद शांततेत पार पडल्याने प्रशासन, पोलिस, पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील बहुतांश शाळा साेमवारी बंद हाेत्या.

सलग सुट्यांमुळे शाळा गुरुवारीच
मंगळवारी विजयदशमी बुधवारी मोहरम सणानिमित्त शाळांना सुटी असल्याने शाळांना सलग तीन दिवस सुट्या मिळाल्या. त्यामुळे आता गुरुवारीच (दि. १३) शाळा नियमितपणे भरतील.
तळेगाव घटनेच्या निषेधार्थ शहर अाणि परिसरात सुरू असलेल्या अांदाेलनामुळे सोमवारी शहरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती हाेती. कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या वरिष्ठ महाविद्यालयांत सध्या पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू असल्याने सोमवारी या परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, अकरावी बारावीच्या तसेच काही वरिष्ठ महाविद्यालयांतील महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मात्र रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या परीक्षा आता गुरुवारनंतर (दि. १३) घेण्यात येणार असल्याची माहिती एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी दिली. केटीएचएम, पंचवटी कॉलेज एचपीटी कॉलेजसह इतर महाविद्यालयांत विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...