आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या शाळांना सुटीची 'पर्वणी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यातील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील शाही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना प्रत्येकी पाच ते सहा दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पर्वणीकाळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे एक कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या काळात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या उच्चांकामुळे या काळात दोन्ही शहरांतील शाळा सुरू ठेवणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांना पाच दिवस, तर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सहा दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ आणि शाळांमधील कामाचे दिवस अध्यापनाचे तास विहित निकषानुसार पूर्ण करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार पर्वणीकाळातील समायोजित सुट्यांच्या बदल्यात (शासकीय सुट्या वगळून) दिवाळीमधील सुट्यांच्या दिवसांत सदरचे दिवस भरून काढले जाणार आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कोणत्‍या शाळांना आहेत सुट्या...