आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये 3 दिवस शाळा बंद, विविध मागण्यांसाठी शिक्षण बचाव कृती समितीचा पवित्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणक्षेत्रा संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९, १० ११ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाचा इशारा जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीने दिला आहे. संस्थाचालकांसह शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. समितीच्या नेतृत्वाखाली यापूर्वी घंटानाद, लोकप्रतिनिंधीच्या घरासमोर निदर्शने अशी आंदोलने करण्यात आली. अाता आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १० ११ डिसेंबरला राज्यभरातील शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी ३० नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक कार्यालयावरही आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात अाले.

{ शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार काढावा.
{ कला क्रीडा शिक्षकांची पूर्ण वेळ नियुक्ती करावी.
{ शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.
{ शाळा, महाविद्यालयांतील वर्ग तुकड्यांना अनुदान द्यावे.
{ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करावा.
{ खासगी संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी.
{ शिक्षण शुल्क रकमेचा परतावा प्राधन्याने देण्यात यावा.
{ २८ ऑगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय त्वरित रद्द करावा.
{ प्राथमिक शाळांमध्ये लिपिक सेवकांची पदे लवकरात लवकर भरावीत.

...तर शाळा बेमुदत बंद करणार
^अांदोलनात संस्थाचालक, मुख्याध्यापक संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा टीडीएफ शिक्षकेतर संघटनांसह इतरही संघटना सहभागी होणार आहेत. १० डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर सर्व संघटनांचा मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनांची दखल घेतल्यास राज्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन केले जाईल. कोंडाजी आव्हाड, अध्यक्ष, शिक्षण बचाव कृती समिती