आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर हलके करण्याचे पहिले पाऊल शहरातील चार शाळांनी टाकले असून, मंगळवार(दि. २४) पासून पाच हजारांहून अधिक मुलांचे दप्तर हलके होणार आहे. मुख्याध्यापकांनी स्वत: पुढाकार घेतल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हलक्या दप्तरांचा आनंद दिसेल.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले होते. जड दप्तराने मुलांना बालवयातच पाठीचे आजार हाेतात. म्हणूनच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना जबाबदारी निश्तिच केली आहे. त्यानुसार, येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सूचित केल्यानंतर त्यास नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि सुखदेव शैक्षणिक संस्थांच्या चार शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विविध मार्गांनी मुख्याध्यापकांनी दप्तर हलके करण्याचा प्रयत्न केला अाहे. या सकारात्मक प्रतिसादाने पालकही सुखावले अाहेत.

तासिकांमध्येच बदल
^शाळेतील तासिकांमध्येबदल करून पुस्तके वह्यांची संख्या कमी करता येईल. तसेच, पाण्याची सुविधा दिल्याने वॉटरबॅगची गरज नाही. नितीन पाटील, मुख्याध्यापक,सुखदेव प्राथमिक शाळा
दोन वह्या शक्य

^एकाच वहीत तीन विषयांचे लेखन हाेऊ शकते. प्रयोगवह्या अामच्याकडेच ठेवू. मग दप्तर हलके होईल. - गीता कुलकर्णी, मुख्याध्यापिका,पेठे हायस्कूल

इ-लर्निंगमुळेही फायदा
^सारडाकन्याविद्यालयात इ-लर्निंग प्रयोग सुरू आहे. हा प्रयोग संस्थेच्या इतर शाळांमध्ये घेतला जाईल. इ-लर्निंगमुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. राजेंद्र निकम, अध्यक्ष,शिक्षक मंडळ,

असे होणार दप्तर हलके
{शाळेत पाणी दिल्यास वॉटर- बॅगची गरज नाही
{ एकाच वहीत विषयांचे लेखन
{ शाळेतच निबंध, प्रयोगवह्या
{ पुस्तकांचा भार कमी करावा

या शाळांत अंमलबजावणी, शाळा विद्यार्थी
पेठे हायस्कूल १७००
सारडा कन्या विद्यालय २५००
सुखदेव प्राथमिक विद्यामंदिर ६००
सुखदेव माध्यमिक विद्यालय ३००