आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ कारणांमुळे शाळांनी नाकारले शिक्षणहक्कचे प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणहक्क कायद्यानुसार शाळांमधील २५ टक्के राखीव जागा भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ऑनलाइन लॉटरीप्रक्रिया राबविली. परंतु, या प्रक्रियेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना अनेक खासगी शाळांनी प्रवेश नाकारले असून, यात सर्वाधिक संख्या अर्जामध्ये किरकोळ चुकांमध्ये अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांची आहे.
शिक्षणहक्क अंतर्गत प्रवेश देण्यासाठी शाळेकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे पालकांना शिक्षण मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागत आहे. तर दुसरीकडे १६६४ प्रवेशांमधील तब्बल ६६० विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेने किरकोळ कारणांमुळे अपात्र ठरवल्याचे समोर आले आहे. अर्ज भरताना झालेल्या किरकोळ त्रुटींमधील काहींचे अर्ज दोन ते तीन शाळांत अर्ज केल्यामुळे त्यांचे प्रवेश इतर शाळेत झाल्याचे शिक्षणहक्कच्या ऑनलाइन वेबसाइटवर दिसत आहे. तर काही भाडेकरू असल्यामुळे त्यांच्याकडे रहिवासी पुरावा नाही, तर काही पालकांनी नायब तहसीलदारांचा स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला दिला नसल्याचे कारण देत अशा ६६० विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळांनी नाकारले आहे. तसेच, काही पालकांनी सर्व कागदपत्र असतानाही शाळेचा आणि तुमच्या घराचे अंतर तीन किलोमीटरच्या आत नसल्याचे कारण देऊन त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
शाळांकडून होत असलेल्या अडवणुकीच्या तक्रारीसाठी पालक शिक्षणाधिकारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयांत हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे संबंधित शाळांवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तातडीने कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. तर, शाळांनी प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी महापालिकेच्या २२ केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले असून, पुढील चार दिवसांत या पथकाद्वारे सर्व प्रवेशासंदर्भात माहिती घेऊन अपात्र प्रवेशांना प्रवेश देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

किरको‌ळ कारणांमुळेच झाले अर्ज अपात्र...
^शिक्षणहक्क अंतर्गत प्रवेश अर्ज भरताना अनेक पालकांनी माहिती व्यवस्थित भरलेली नाही. यामुळे फक्त किरकोळ कारणांमुळे तब्बल ६६० विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी अपात्र केले आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. - धनंजय कोळी, विस्तारअधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद
बातम्या आणखी आहेत...