आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांच्या दिवाळी सुटीत यंदा कपात, सिंहस्थ पर्वणीतील समायोजित सुट्या काढणार भरून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वण्यांच्या काळात शाळांना पाच-सहा दिवस सुटी देण्यात आल्याने या समायोजित सुट्या भरून काढण्यासाठी दरवर्षीच्या तुलनेत यंदा शाळांना िदवाळीच्या सुट्या कमी मिळणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांना दहा, तर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना पंधरा िदवस सुट्यांचा लाभ हाेणार अाहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली शाही पर्वणी २९ ऑगस्ट, तर नंतरच्या पर्वण्या १३, १८ २५ सप्टेंबरला झाल्या. या पर्वण्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवसांची सुटी देण्यात आली होती. सिंहस्थातील पर्वणीकाळात शहरात लाखो भाविक येणार असल्याने या काळात वाहतूक व्यवस्थेवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन या काळात दोन्ही शहरांतील शाळा सुरू ठेवणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्राथमिक शाळांना पाच, तर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सहा दिवस सुटी देण्यात आली हाेती. असे जरी असले तरी बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ आणि शाळांमधील कामाचे दिवस अध्यापनाचे तास विहित निकषानुसार पूर्ण करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार पर्वणीकाळातील समायोजित सुट्यांच्या बदल्यात (शासकीय सुट्या वगळून) दिवाळीमधील सुट्यांच्या काळात हे दिवस भरून काढले जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होतील. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या माेठ्या सुटीचा अानंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांचा यंदाच्या दिवाळीत काहीसा हिरमाेड हाेण्याची शक्यता अाहे.

अन्य काळात सुट्या भरणे शक्य
दिवाळीतीलसुट्यांचा कालावधी कमी करता पर्वणी काळातील समायोजित सुट्या दिवाळीनंतरच्या इतर सुट्यांमध्ये भरून काढाव्यात. शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवून, तसेच इतर सु्ट्यांच्या दिवशीही या समायोजित सु्ट्या भरता येतील. नितीनपाटील, मुख्याध्यापक